शिंदाड येथील जुगार अड्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे जुगाराचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना कळाल्यावर दिनांक २० मार्च शनिवारी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे.यांनी हेड कॉन्स्टेबल श्री.रणजित पाटील. पोलीस कॉन्स्टेबल श्री. अरुण राजपूत, श्री.ज्ञानेश्वर बोडखे, श्री.दिपकसिंग पाटील, श्री.उज्ज्वल जाधव, श्री.मुकश लोकरे याच्या पथकासह जुगाराचे अड्यावर धाड टाकुन कारवाई केली.
या कारवाईत हरी पुंडलीक पाटील, आत्माराम पुंजाराम पाटील, सरवर रशिद तडवी, राजु उस्माध तडवी. सर्व रहाणार शिंदाड यांचे विरोधात पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नामदेव बोडखे यांच्या फिर्यादीवरून म.जु. ॲक्ट १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जुगाराचे ठिकाणी ७४०/०० रोख व ५२ पत्ते असलेला पत्त्याच्या कॅट जप्त करण्यात आला आहे.