श्री. जैन अलर्ट गृप ऑफ इंडिया व श्री. महावीर गोशाळेतर्फे निराधारांना दिली मायेची उब.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२३
सद्यस्थितीत हिवाळ्यात सगळीकडे कडाक्याची थंडी जाणवत आहे. या कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर व उघड्यावर राहणाऱ्यांना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत व थंडीपासून बचाव करण्यासाठी कोणतेही उबदार पांघरुण नाही अश्या वंचित घटकांना मदत करावी व आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनाशी बाळगून या गोरगरीबांना थंडीपासून बचाव करण्यासाठी श्री. जैन अलर्ट गृप ऑफ इंडिया, अहमदाबाद अंतर्गत येणारी मुंबई शाखा व पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील श्री. महावीर गोशाळेच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच उबदार शालींचे वाटप करण्यात आले.
या उबदार शालींचे वाटप करतांना पाचोरा शहरातील गौंड वस्ती, गोंधळी वस्ती, भिलाटी व इतर परिसरात तसेच तारखेडा, चिंचखेडा, अंबे वडगाव, साजगाव, सांगवी व इतर गावांतील २३५ गरजूंना शोधून उबदार शालींचे (ब्लॅंकेट) वाटप करण्यात आले. हे वाटप करण्यासाठी वरखेडी गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पप्पूभाऊ बडोला व श्री. जैन अलर्ट गृप इंडियाचे सदस्य मा. श्री. कुशलभाऊ सोळंकी यांनी अथक परिश्रम घेतले.