जामनेर तालुक्यात शेंदुर्णी येथून शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियानास सुरुवात.
गणेश पांढरे.जामनेर(प्रतिनिधी)
दिनांक~२५/०५/२०२३
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने शिवसंपर्क अभियानास सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शिवसंपर्क अभियानासाठी शिवसेना पक्षातर्फे आबासाहेब पतंगे हे पक्षनिरीक्षक म्हणून ४ दिवस जामनेर तालुक्यात शिवसंपर्क अभियानासाठी आलेले आहेत. बुधवारी दिनांक २५ मे २०२२ बुधवार पासून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून श्री. त्रिविक्रम महाराज यांचे दर्शन घेऊन तेथील माहिती जाणून घेऊन शिवसंपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला संबोधित करतांना आबासाहेब पतंगे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगितले की ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गाव तेथे शाखा व घर तिथे शिवसैनिक अशी संकल्पना राबविण्यात यावी. तसेच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली कामे व सरकारी योजना या तळागाळातील लोकांना सांगून त्यांना सरकारी योजनेचा फायदा मिळवून देण्याचे काम शिवसैनिकांनी करावे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला पक्षनिरीक्षक आबासाहेब पतंगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजित पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील, माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख ॲड भरत पवार, वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक ईश्वर चोरडिया, पहूर कसबे ग्रामपंचायत सदस्य व उपतालुका अशोक जाधव, शेंदुर्णी शिवसेना शहर प्रमुख भैय्या गुजर, तालुका प्रवक्ते गणेश पांढरे, युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील, सुनील गुजर, रविन्द्र गुजर, जय हरी महाराज, शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक संतोष दादा माळी, बारकू जाधव, अशोक बारी, अरुण दादा गवळी, सुनील भाऊ बेराड, संतोष माळी, अशोक गुजर, सिद्धेश्वर पाटील, भूषण बडगुजर, गणेश कोळी, कैलास शेठ काबरा, विराज भाऊ पाटील , शेतकरी नेते सुनील अग्रवाल, संदीप बारी, तुकाराम पाटील यांच्यासह इतर शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.