निर्मल फॉंऊंडेशन पाचोरा तर्फे पत्रकारांसाठी, पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०१/२०२३
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सगळीकडे पत्रकार दिन साजरा करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पाचोरा येथील निर्मल फॉंऊंडेशन, निर्मल इंटरनॅशनल स्कूल (ही.बी.एस.ई.) निर्मल सिडस प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिनांक ०९ जानेवारी २०२३ सोमवार रोजी सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ०५ वाजेपर्यंत पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून लेखक, कवी, पत्रकार, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि सकाळ समूहाचे माजी मुख्य संपादक हे उपस्थित राहणार असून या कार्यशाळेचे उदघाटक म्हणून पाचोराचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. विक्रमजी बांदल साहेब, दैनिक लोकशाहीचे सल्लागार संपादक मा. श्री. धो. जय. गुरव, दैनिक देशदूतचे संपादक मा. श्री. हेमंतजी आलोने, दैनिक दिव्य मराठीचे संपादक मा. श्री. दिपकजी पटवे, दैनिक पुण्यनगरीचे संपादक मा. श्री. विकासजी भदाणे, दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मा. श्री. मनोजजी बारी, दैनिक सकाळचे ब्यूरो चिफ मा. श्री. सचिनजी जोशी हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यम आदर्श समाज बांधणीसाठी प्रसार माध्यमांची नितांत गरज आहे. वृत्तपत्रे ही एक सामाजिक शक्ती असून माणसांची मने घडवण्यासाठीचे सामर्थ्य लेखणीमध्ये असते. क्रांतिकारी विचारांच्या प्रसाराचे कार्य लेखणी करते आणि राजसत्तेला सुरुंग लावून क्रांती करणारी ही लेखणीच असते. ही लेखणी ज्याच्या हातात असते तो हात म्हणजे पत्रकार.
परंतु जग बदलत चाललय सोबतच झपाट्याने प्रसारमाध्यमांमध्ये कमालीची प्रगती होत असून यात अतिजलद वेगवेगळ्या साधनांचा व वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन पत्रकारांना घडवण्यासाठी, त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी, त्यांच्या बातमीची गुणवत्ता वाढविण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी, त्यांची विचार गर्भता वाढविण्यासाठी, लोकशाहीच्या मुल्यांची जपणूक करण्यासाठी, पत्रकारांच्या शब्दाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी या कार्यशाळेत येऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.