दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२३

पोलीस हा राज्सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. पोलिस कर्तव्यनिष्ठ असतात. ते उन, वारा, पावसातच नव्हे तर कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस इमानेइतबारे काम करत असतात.

असेच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलिस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे साहेब, पोलिस निरीक्षक मा. श्री. राहुल मोरे साहेब, उपनिरीक्षक सहायक फौजदार मा. श्री. योगेश पाटील व जितेंद्र वल्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विश्वास देशमुख, दिपक सुरवाडे यांनी गोपनीय पद्धतीने उत्कृष्टरित्या तपास करुन १७ डिसेंबर २०२२ रोजी पाचोरा शहरातून चोरीला गेलेली फॅशन प्रो व अन्य दोन गाड्या शोधून काढल्या असून या गाड्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच मुळ मालकाला परत केल्या जाणार आहेत. त्यांच्या या कामगिरीचे पाचोरा शहरासह तालुक्यातून कौतुक होत आहे.