पाचोरा येथील सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांचा लोकमत तर्फे भव्य सत्कार.
अनिल आबा येवले.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२२
पाचोरा येथील स्वर्गीय श्री. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांची कन्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी वडीलांच्या पावलावर, पाऊल ठेवून भारतातीलच नव्हे तर जगभरात नामांकित असलेल्या निर्मल सिडच्या (बियाणे) फॅक्टरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत, जास्त, भरघोस उत्पन्न मिळवून देण्यासाठी चांगल्या उत्तम प्रतीचे बि, बियाणे, खतांची निर्मिती करुन वाजवी दरात उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे शेतीमाल उत्पन्न मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल तसेच याच सोबत आपल्या परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगल्याप्रकारे शिक्षण मिळावे म्हणून निर्मल इंटरनॅशनल स्कुलचे माध्यमातून अत्यल्प शैक्षणिक शुल्कात शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
तसेच स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना उराशी बाळगून तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी, भल्यासाठी शासनाच्या माध्यमातून समाजाभिमुख व जनहितार्थ कामे करता यावी म्हणून तसेच महिला सबलीकरणासाठी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. लोकमतने सौ. यांच्या याच कामाची दखल व आढावा घेऊन सामाजिक क्षेत्रातील एक सक्षम व समाजसेवेचा वसा घेतलेल्या महिला म्हणून सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांचा नुकताच सन्मान व सत्कार केला आहे. लोकमतने केलेला सन्मान व सत्कार हा पाचोरा तालुक्यातील जनतेसाठी अभिमानाची बाब असल्याने पाचोरा तालुक्यातील जनतेतून सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तालुक्यात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.