पाचोरा रोटरी क्लबतर्फे मोफत कापडी पिशव्यांचे वाटप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०८/२०२२
येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांचे तर्फे “प्लास्टिक मुक्त पाचोरा मोहीम” हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक २० ऑगस्ट शनिवार रोजी शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व हुतात्मा स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. “आता तरी सावध होऊ या’ “संपूर्ण प्लास्टिक बंद करूया” या घोषवाक्याने या “प्लास्टिक मुक्त पाचोरा” मोहिमेची सुरुवात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
या प्रसंगी उपप्रांतपाल श्री. विकास पाचपांडे, श्री. उपप्रांतपाल राजेश, श्री. बाबूजी मोर, उपप्रांतपाल श्री. प्रदीप पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ अमोल जाधव, सेक्रेटरी गोरखनाथ महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.अजय सिंग परदेशी, तसेच उपस्थित रोटेरियन बांधवांच्या हस्ते सुमारे ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे उपप्रांतपाल विकास पाचपांडे यांनी भुसावळ येथून एका गरजू व होतकरू परिवाराकडून या ५०० पिशव्या बनवून आणल्या होत्या.
याप्रसंगी रो. शैलेश खंडेलवाल, रो.डॉ. बाळकृष्ण पाटील, रो.डॉ. विशाल पाटील, डॉ. वैशाली जाधव, सौ वर्षा पाटील, रो.रावसाहेब पाटील, रो. भारत सिनकर, रो. चंद्रकांत लोढाया, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, दीपक पाटील पवन पाटील पंकज शिंदे मनोज केसवानी, जयेश पाटील आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.