पिंपळगाव हरेश्वर येथे सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सहाय्याने जंतुनाशक, डास नियंत्रक फवारणीचा शुभारंभ

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२३

सद्यस्थितीत पावसाळा संपला असला तरी अद्यापही अधुनमधून ढगाळ वातावरण, तसेच दिवसा उन्हाचे चटके तर रात्री थंडीचा वाढता जोर यामुळे लहान, लहान मुल, बाळ व जेष्ठ नागरिकांना या बदलत्या वातावरणाचा परिणाम जाणवत असून यातच भरीत भर म्हणून अजून गाव, खेड्यापाड्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सगळीकडे हिवताप व डेंग्यू आजाराची लक्षणे जाणवत असून बरेचसे रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन जनतेच्या अनमोल आरोग्याचे व प्राणांचे रक्षण करण्यासाठी “आरोग्य तुमचे काळजी आमची” ही सामाजिक बांधिलकी जपत आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पाचोरा, भडगाव मतदार संघाच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी डास निर्मुलनासाठी (नायनाट) करण्यासाठी स्वखर्चाने मागील महिन्यापासून जंतुनाशक फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पाचोरा, भडगाव तालुक्यातील गावागावात जाऊन जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.

तसेच पाचोरा तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथे डेंग्यू आजाराची तीव्रता लक्षात घेऊन डास निर्मुलनासाठी आज सकाळी दहा वाजता निर्मल सिडस प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या माध्यमातून सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी दहा वाजता पिंपळगाव हरेश्वर येथील शनी मंदिर चौकात जंतुनाशक फवारणीचा शुभारंभ करण्यात आला व ही जंतुनाशक फवारणी संपूर्ण पिंपळगाव हरेश्वर गावातील गल्लीबोळात करण्यात आली.

याप्रसंगी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, उपजिल्हा प्रमुख उध्दवभाऊ मराठे मा. अरुणभाऊ तांबे युवासेना तालुकाप्रमुख शशिकांत पाटिल, उपतालुका प्रमुख भगवानभाऊ पाटिल, युवासेना उपतालुका प्रमुख प्रितेशभाऊ जैन, शहरप्रमुख भागवत पाटिल, शहरप्रमुख समाधान हटकर, कोमल आबा, देवीदास पाटिल, नाना सरकार, राजधर आबा, कैलास आप्पा, बि. डी. पाटिल सर उपसरपंच गिते सर मिलिंदतात्या देव तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. पुष्पाबाई कोमलसिंग देशमुख सौ, करुणाबाह भास्कर पाटिल, सौ. सुनंदाबाई कैलास क्षिरसागर, सौ. सुनिताबाई भगवान पाटिल (माः सरपंच), श्री. अजयभाऊ तेली, श्री. प्रशांत भास्कर पाटिर, श्री. राहुल बडगुजर श्री. अंतिम महाजन, श्री. सलिम शेख तसेच शिवसैनिक, अतुल सुर्यवंशी, विकास गुजर, सुरेश वाघ, भुषण तेली, अनिकेत जैन, समाधान माऊली, पिंटु येवले, किरण पाटिल, राहुल पाटिल, राहुल चौधरी, तेजस पाटिल, कमलेश मालकर सह समस्त ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या