मा.शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस पाचोरा येथे जल्लोषात साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१२/२०२०
कालरोजी मा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा तालुक्यात मा.आ. दिलीप भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम साजरे करण्यात आलेत.
१४ वर्षा खालील मुलांसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यांचे उद्घाटन मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांचे उपस्थितीत करण्यात आले.
तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
त्यांनतर मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाचोरा शहरातील न.पा.सफाई कर्मचाऱ्यांचा(२५०) कोरोना काळात केलेल्या कामा बद्दल सन्मान करण्यात आला.
हे सर्व कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घेण्यात आलेत. सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आ दिलीपभाऊ वाघ यांचे हस्ते करण्यात आलेत.
तसेच ह्या सर्व कार्यक्रमाना खालील पदाधिकारी गटनेते तथा नगरसेवक संजय वाघ, प्राचार्य बी. एन. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे,व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, खलील देशमुख, अझहर खान, दत्ता पाटील,तालुका अध्यक्ष विजू पाटील,शहर अध्यक्ष भोला चौधरी नगरसेवक सुचेता वाघ,तनिष्का गटप्रमुख ज्योतिताई वाघ, तालुका प्रमुख सरलाताई पाटील, शहर प्रमुख जयश्रीताई मिस्तरी सर्व आजी – माजी नगरसेवक,पी. टी. सी. संचालक, सर्व फ्रंटलचे प्रमुख पदाधिकारी,युवक, सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक विकास पाटील यांनी केले.