आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, कळमसरा येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०१/२०२२
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कळमसरा येथे श्री.गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय जळगाव यांच्या सहकार्याने सर्व आजारांची मोफत तपासणी ९ जानेवारी रविवार रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. या शिबिरात सर्व आजारांच्या तपासणी व मोफत उपचारासाठी जळगाव येथील नामांकित तज्ञ डॉक्टर येणार असून गरजू रुग्णांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार व ऑपरेशन करण्यात येणार आहे. तरी पाचोरा व जामनेर तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन आयोजकांनी केले आहे.
विशेष म्हणजे या शिबिरातील नोंदणीकृत रुग्णांसाठी महात्मा फुले जीवनदायी योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिरात डॉ.मनोज पाटील.(न्यूरो सर्जन), डॉ.अतुल भारंबे (कॅन्सर तज्ञ), डॉ.श्रीराम महाजन.(प्लॅस्टिक सर्जन),
4. डॉ.प्रियंका चौधरी. (स्त्रीरोग तज्ञ), डॉ.अभिजीत पाटील.(अस्थिरोगतज्ञ),डॉ.अनुश्री व्ही.(एम.डी.मेडिसिन), डॉ.वृषाली. व्ही.पाटील.(नेत्रतज्ञ), डॉ.नीरज चौधरी.(मूत्र विकार तज्ञ), डॉ.अतुल सोनार.(एमडी पॅथॉलॉजी), डॉ.वैभव गिरी.(स्त्रीरोग तज्ञ), डॉ. रोहन पाटील.(लॅप्रोस्कोपिक व जनरल सर्जन) डॉ. स्वप्नील गिरी.(बाल रोग तज्ञ), डॉ.आदित्य नागराजन.( त्वचारोग विकार तज्ञ), डॉ.अमित नेमाडे.(फिजिओथेरपिस्ट), डॉ.अश्विनी चव्हाण.(दंतरोग तज्ञ) या सर्व तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे.
हे शिबीर जिल्हापरिषद मराठी मुलांची शाळा कळमसरा येथे घेण्यात येणार असून या शिबिरात येतांना प्रत्येक रुग्णांने आपले अगोदर केलेल्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे तसेच तपासणी अहवाल सोबत आणावेत तसेच येतांना तोंडाला मास्क लाऊन येणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क नसलेल्या गरजूंना शिबिरात प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शिबिराचे ठिकाणी सामाजिक अंतर राखून शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी व कळमसरा गावचे प्रथम नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सरपंच मा.श्री. अशोक दादा चौधरी यांनी केले आहे.