शेंदुर्णी शहरातील नर्मदा कॉटन इंडस्ट्रीज जिनिंगला अचानक लागलेल्या आगीत सुमारे ३५ लाखांचे नुकसान.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०१/२०२३
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरातील नर्मदा कॉटन इंडस्ट्रीज जिनिंगला अचानक लागलेल्या आगीत सुमारे ३५ लाखांची कपाशीची रुई जळून खाक झाली. या प्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी येथील गट नंबर ५२००/२/२ कृष्णा उद्योग नर्मदा कॉटन इंडस्ट्रिज जिनिंगच्या गोडावूनला दिनांक ०७ शनिवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक इलेक्ट्रीक शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे आग लागली. यात दोन्ही गोडावूनमध्ये असलेली अंदाजे १९० क्विंटल वजनाची कपाशीची (रुई) जळाल्याने अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दीपक रामचंद्र अग्रवाल यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार प्रशांत विरनारे करीत आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.