ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यजितच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२२
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो अशी भावना मनाशी बाळगून
समाजामध्ये असलेल्या सुखदुःखांना आपलंसं करून घेणारा दुःखामध्ये मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारा असा कुणीतरी व्यक्ती असावं म्हणून परमेश्वर अशा समाजसेवक, देवदुतांना जन्माला घालून पृथ्वीवर पाठवतो. असाच एक समाजसेवक कार्यतत्पर शुद्ध मनाचा राजकारणी ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त भाऊंना आभाळ भरून शुभेच्छा.
अगदीच लहानपणापासून आपला स्वतःचा एक वेगळा असा मार्ग ज्ञानेश्वर भाऊंनी निवडला. आपण समाजाचे देण लागतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याप्रमाणे त्यांनी समाजसेवा सुरू केली हळूहळू त्या समाजसेवेचं रूपांतर राजकारणात झालं २०१५ सालापासून सात वर्ष भोकरी तालुका पाचोरा विकास सोसायटीच सदस्यत्व व चेअरमन पद भूषविले, विशेष त्यांच्या या समाजसेवा व राजकारणात त्यांच्या अर्धांगिनी सौ. उषाताई सोनार यांनी मोलाची साथ दिली २०१५ सली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्या निवडून आल्या व गावाच्या प्रथम नागरिक म्हणून सरपंच म्हणून पदभार स्वीकारला.
दोघेही उभयतांनी गावासाठी विकासाची गंगा आणली गावाचा खऱ्या अर्थाने विकास केला. तदनंतर २०१७ या वर्षी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत प्रचंड मताधिक्य घेऊन ज्ञानेश्वर भाऊ सोनार निवडून आले आणि पंचायत समिती सदस्य म्हणून गावासोबतच आपल्या गणाचा विकास केला, पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या गण, गटात गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शौचालयासाठी जास्तीत जास्त अनुदान मिळवून दिले. शबरी व रमाई योजनेच्या अंतर्गत गोरगरीब जनतेला घरकुलाचा लाभ मिळवून देत गरिबांना स्वतःचं घर मिळवून दिलं
वेळोवेळी पाठपुरावा करून कुऱ्हाड वरखेडी तसेच सजगाव वरखेडी रस्त्याचा विषय मार्गी लावला, वरखेडी भोकरी आंबेवडगाव येथे रस्ता कॉंक्रिटी करण पेव्हर ब्लॉक भूमिगत गटारीची कामे केली. तसेच गणात बऱ्याच गावात सौर ऊर्जेचे दिवे लावून दिले तसेच विशेष योजना अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात बसण्यासाठी बाकडे दिले असे अनेक विकासाची काम त्यांनी केले, दुसरी गोष्ट म्हणजे समाजातील सुख दुःख लग्नकार्य धार्मिक उत्सव या ठिकाणी उपस्थित राहून पदरमोड करून आपला सहभाग नोंदवला, अशा ह्या समाज रत्न विकास पुरुषाला खऱ्या समाजसेवकाला सच्चा राजकारण्याला मनापासून वाढदिवसाच्या कोटी, कोटी शुभेच्छा.