शहरात पुढारी, गावात कार्यकर्ते करतात पाठराखण, म्हणूनच वाढते आहे कोरोनाचे संक्रमण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०३/२०२१
सर्वदूर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दररोज रुग्णवाढीचा आकडा झपाट्याने वाढत आहे. एका बाजूला सर्वच यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव कसा थांबवता येईल याकरिता रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून खडा पहारा करत नवनवीन उपाययोजना व कायदे आमलात आणत आहेत.
तर दुसरीकडे शहरात काही पुढारी तर खेडेगावातून बरेचसे कार्यकर्ते आपपल्या मर्जीतील लोकांना खुष ठेवण्यासाठी व आपली प्रतिष्ठा कशी वाढेल याकरिता कोणत्याही दुष्परिणामांची जाणीव न ठेवता लॉकडाऊच्या कालावधीत शासनाने जाहीर केलेले कायदे, नियम व अटी पायदळी तुडवत लग्नसमारंभ, साखरपुडा,क्रिकेट सामने हरिनाम सप्ताह, कुठे देवाची मेंढर तर कुठे नवसाचे कार्यक्रम स्वताच्या उपस्थितीत पार पाडून स्वताची कॉलर ताट करुन घेतांना दिसून येत आहेत.
या कारणांमुळे शहरातील तसेच खेडेगावातील होणाऱ्या या सार्वजनिक कार्यक्रमात गावातील व बाहेर गावाहून आलेले लोक मोठ्या संख्येने उपस्थित होत असल्याने एकाच ठिकाणी जमाव जमून लॉकडाऊनचा (सामाजिक अंतर) फज्जा उडत असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून या गैरप्रकारांना आळा न घातल्यास अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून ज्या गावातून नियम पाळले जानार नाहीत. व नियमांची पायमल्ली होत असेल तर अश्या गावातील प्रथम नागरिक सरपंच, पोलिस पाटील यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञनागरिकांनी केली आहे.