भोला भाऊ शळके यांना वाढदिवसानिमित्त लेखणीचे शिलेदार संतोष पाटील यांच्याकडून आगळ्यावेगळ्या शुभेच्छा.

*गाजर मिळाल्यावर बाजार मांडणारे खूप झाले*
*मात्र बाजार पांगल्यावर ही निष्ठेने उभा राहणारा*
*”या सम हा”*
———————————————-
मनुष्य जीवन जगत असतांना आपली स्वतःची अशी एक वैचारिक बैठक निर्माण करतो एक वेगळी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करतो, असं करत असतांना लोक काय म्हणतील याचा तो विचार करत नाही. असेच एक आगळ वेगळं हरहुन्नरी, बहुआयामी, व्यक्तिमत्त्व म्हणजे भोला भाऊ शेळके. यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसाच्या निमित्ताने भोला भाऊ यांना लाख लाख शुभेच्छा.

एका शेतकरी, शेतीनिष्ठ, कष्टकरी, सुशिक्षित, शिक्षण प्रेमी, अशा वैभवशाली कुटुंबात भोला भाऊ यांचा जन्म झाला. घरामध्ये कुठलाच राजकीय वारसा नाही आजोबांपासून ते आत्तापर्यंत सामाजिक कार्य, प्रेम, निष्ठा, एक वाक्यता, सत्यता, इत्यादी गोष्टी विरासत मधून भोला भाऊ यांना मिळाल्या. घरामध्ये काका, चुलते, वडील, भावंडे सर्वच उच्चशिक्षित मोठे काका प्रभाकर शेळके सर प्रतिभा संपन्न असे कवी दुसरे काका मराठे सर एका शिक्षण संस्थेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त, भावंडे शिक्षक आणि त्यांचे वडीलही उच्चशिक्षित होते. घरामध्ये शिक्षण, पहिलवानकी, शेती असं वातावरण अशा समृद्ध वातावरणामध्ये भोला भाऊंची जडणघडण झाली. लहान वयातच राजकारणाचा गंध लागलेला हा माणूस समाजकारणाची आणि राजकारणाची सांगड घालत आतापर्यंत जगत आला. खऱ्याला खरे व खोट्याला खोटे म्हणण्याची सवय अंगीकृत असल्याने या माणसाने बऱ्याचवेळा स्वतःच अंगावर वाद ओढवून घेतले मात्र कधीही तत्त्वाची तडजोड केली नाही. राजकारण करायला लागल्यापासून शिवसेनेचे काम करणारा हा सच्चा शिवसैनिक कधीच पदासाठी, मोठेपणासाठी हापापलेला नव्हता, आणि आता ही नाही. आपल्यावर पक्षानं सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडायची इतकंच ह्या माणसाला माहीत, प्राथमिक विद्यामंदिर वडगाव आंबे शाळेचं शालेय समिती अध्यक्ष पद स्वीकारल्यावर शाळेचे पूर्णपणे रूप बदलवून शाळेसाठी पूर्णपणे वेळ देणारा हा एकमेव तरुण शाळेसाठी सदैव तत्पर राहिला आणि राहतोय, इतर पक्षाच्या लोकांनी त्याला अनेक प्रलोभन दाखवले मात्र हा भगव्याचा पाईक असणारा भगवाधारी कधीच बदलला नाही‌. अनेक संकटे, अडीअडचणी आल्या मात्र तो चालत राहिला. अशा या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाला, समाजसेवकाला, एकनिष्ठ कार्यकर्त्याला मनापासून वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा
भोला तुझं राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, आरोग्य, व्यवस्थित राहो आणि आई भवानी तुला दीर्घ आयुष्य देवो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा

संतोष पाटील
7666447112

ब्रेकिंग बातम्या