उजाड माळरानावर स्वप्न पेरून वास्तवाचे यशस्वी पीक घेणारा, राजा माणूस म्हणजेच देवकर साहेब.
दिनांक~२९/०६/२०२३
*उजाळ माळरानावर स्वप्न पेरून*
*वास्तवाचे यशस्वी पीक घेणारा*
*राजा माणूस म्हणजेच देवकर साहेब*
———————————————
आपण कुठे व कसे जन्माला यावे हे माणसाच्या हातामध्ये नसते मात्र आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो त्या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे हे माणसाच्या हातामध्ये असते, लेकुरवाळी स्वप्न पाटकुळी घेऊन रानोमाळ हिंडत फिरणाऱ्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सतत धडपडत असणाऱ्या अशा एका स्थितप्रज्ञ, अवलिया, माणसाचा अदिती अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी म. बुलढाणा. रजिस्टर नंबर ३३७ चे संस्थापक अध्यक्ष माननीय मा. श्री. सुरेशजी देवकर साहेब यांना वाढदिवसानिमित्त आभाळ भरून शुभेच्छा.
माननीय देवकर साहेब यांच्या बद्दल व यांच्या कार्याबद्दल काही ओळींमध्ये लिहिणं अशक्य प्राय आहे. मात्र यांचकार्य, त्यांचा संघर्ष, त्यांचा जीवनपट व वाढदिवसाच्या शुभेच्छा पर मी लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न करतोय, खरे म्हणजे आपली नोकरी, आपलं घर, असं एक छोटसं विश्व निर्माण करून सध्या माणसं जीवन जगत आहेत. मात्र हा माणूस या सर्व गोष्टींपासून फार लांब आहे आपण नोकरी करून आपल्या घरदार चालवावं इतकंच आपलं विश्व का ? असा प्रश्न वारंवार देवकर साहेबांच्या मनामध्ये येत होता.
परंतु आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्यामध्ये असणार रसायन त्यांना शांत बसू देत नव्हतं, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, कृषी सहाय्यक अशा अनेक नोकऱ्या करून साहेबांचे मन भरल नाही. त्यांच्यामध्ये असलेली उर्मी सतत दाटून येत होती. मी समाजाचं काहीतरी देणं लागतो मला समाजासाठी काही केलं पाहिजे हे विचारा मनात घोळत असतांना अशातच सन २००३ साली आदिती अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाचं ईवलस बीज माळाराणावर पडलं आणि बघता, बघता दोन दशकाच्या कालावधीत अर्धा महाराष्ट्रभर पोहोचलं.
अमानूष सावकारीचा जोखंडात भरडला जाणारा गरीब, दुबळा, सामान्य माणूस शेतकरी सुटला पाहिजे, त्या शेतकऱ्याला वेळेवर पतपुरवठा झाला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तत्पर अर्थसाह्य देणारी अदिती अर्बन बॅंक नावारूपाला आली. त्या ईवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष आज रोजी आपणास पाहण्यास मिळत आहे. मा. श्री. देवकर साहेब यांच्यामध्ये आजही शिक्षक तसाच मुरलेला आहे. एम. पी. एस. सी. पास आऊट झाल्यावरही कुठल्या मोठ्या हुद्याची अधिकाराची वाट न पाहाता आपली स्वतःची वाट निर्माण केली व या वाटेवर असंख्य गरजूंना सोबत घेऊन सहप्रवास सुरू केला.
आज रोजी अदिती अर्बनच्या जवळ जवळ ५६ ते ५७ शाखा कार्यरत आहेत, सहज सुलभ गरीब, दुबळा, शेतकरी, नोकरदार, व्यवसायिक, या सर्वांना या बॅंकेतून त्वरित कर्ज मिळत. बँकेचं कर्ज घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय उभा करावा शेती नीट करावी सावकारीच्या पाशातून शेतकरी मुक्त झाला पाहिजे अशी इच्छा मनाशी ठेवून देवकर साहेब कर्ज वाटप करत राहतात. दुसरी गोष्ट अशी निव्वळ आपला व्यवसाय हे इतकेच सरांचे स्वप्न नाही. ते समाजकार्यामध्ये सतत अग्रेसर असतात. सामाजिक, राजकीय, धार्मिक या सर्व कार्यांसाठी नुसते हार्दिक शुभेच्छा न देता आर्थिक शुभेच्छा ही सर सतत देत असतात.
बुलढाणा व बुलढाणा परिसरामध्ये मा. श्री. देवकर सरांचे काम सर्वश्रुत आहे. समाजापुढे आदर्श ठेवतांना स्वतःचे कुटुंब शिक्षण तसेच आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने करून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनिष्ट चालीरीती लग्नामध्ये केलेला अनावश्यक खर्च, बडेजाव या गोष्टीमुळे सामान्य माणूस शेतकरी कर्जबाजारी होऊन जातो त्याला आपली जमीन विकण्याची वेळ येते अशी परिस्थिती येऊ नये म्हणून साध्या पद्धतीने लग्न केलं पाहिजे हे समजावून सांगताना आपल्या लाडक्या लेकीचं लग्न साध्या पद्धतीने करून दाखवलं. थोडक्यात सांगायचे म्हणजे *बोले तैसा चाले* या ओळींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. बुलढाणा सारख्या पावनभूमीमध्ये सरांचा जन्म झाला साडेचारशे वर्षांपूर्वीची आई जिजाऊंनी स्थापन केलेली शेतकऱ्यांसाठीची पतपेढी आजही आदिती अर्बन च्या माध्यमातून दिसते आहे.
*अर्थ विना अर्थ नाही, अर्थ विना सार व्यर्थ* असे सतत सांगणारे देवकर साहेब खऱ्या अर्थानं समाज भूषण आहेत, समाजामध्ये परमेश्वर अशा व्यक्तींना जन्माला पाठवतो त्यांच्या हातून परमेश्वरीय कार्य करून घेतो, माननीय देवकर साहेब यांना पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
*प्रार्थयामहे भव शतायु: ईश्वर: सदा त्वाम् च रक्षतु।*
*पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय जीवनम् तव भवतु सार्थकम्।।*
संतोष पाटील
७६६६४४७११२