आठ चोरीच्या दुचाकींसह पिंपळगाव हरेश्वरचा चोरटा जाळ्यात

दिलीप जैन. (पाचोरा)
जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच होते याची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे लाख 55 हजार रुपये किंमतीच्या आठ चोरलेल्या दुचाकींसह पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जमील आयुब शेख या अट्टल दुचाकी चोरट्याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने शेंदूर्णीसह पहुर भागातून दुचाकींची चोरी करीत त्या वाळूज व औरंगाबाद येथे विकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजय शामराव पाटील, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, ईशान तडवी तसेच सहाय्यक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीने औरंगाबाद शहरातूनही दुचाकी चोरल्याचा संशय असल्याने तेथे पथक रवाना करण्यात आले तर आरोपीला अधिक तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.