कोल्हे येथील प्राथमिक शाळेचे शिक्षकावर दुचाकीवरुन येत असतांना अज्ञाताकडून दगडफेक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२३

पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक मा. श्री. प्रशांत बडगुजर हे पिंपळगाव हरेश्वर येथून कोल्हे गावी येत असतांना यांच्यावर दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ शनिवार रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कोल्हे गावापासून काही अंतरावर झाडाझुडुपांमध्ये लपून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी बेसुमार दगडफेक केली. या अचानकपणे झालेल्या दगडफएकईमउळए मा. श्री. प्रशांत बडगुजर यांचा दुचाकीवरचा ताब सुटल्याने अपघात होऊन किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अज्ञात दगडफेक करणाऱ्या व्यक्तींन विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता कोल्हे येथे कार्यरत असलेले शिक्षक मा. श्री. प्रशांत बडगुजर हे शांत व मनमिळावू स्वभावाचे असून हे गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य स्वखर्चाने देतात तसेच पिंपळगाव हरेश्वर ते कोल्हे रस्त्यावर कोल्हे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर काही पावरा समाजातील शेत मजूर रहात असून या मजुरांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलींना शाळेत दाखल करुन घेत दररोज पिंपळगाव हरेश्वर येथून येतांना त्यांना शाळेत आणणे व परत जातांना घरी सोडणे हा उपक्रम राबवत असल्यामुळे आज पावरा कुटुंबातील लहान, लहान शिक्षण घेत आहेत.

अशा या सुस्वभावी, मनमिळाऊ व परोपकारी ५२ वर्षीय शिक्षकावर दगडफेक का केली गेली याचा कानोसा घेतला असता कोल्हे गावात अवैध दारु विक्री, गांजा पिणारे व जुगार खेळणारे काही टवाळखोर मुले या प्राथमिक विद्या मंदिराच्या प्रांगणात व ओट्यावर बसून आपले आंबट शौकीन आपली व्यसनपूर्ती करत होते. म्हणून गावातील काही सुज्ञ नागरिकांनी यांना समज दिली होती व या नाराजीतून व्देश भावनेतून ही दगडफेक करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले असून लवकरच हल्लेखोरांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या