एसटी बसेस मध्ये सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०२/२०२१
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबावा म्हणून शासन, प्रशासन पराकोटीचे प्रयत्न करत असतांनाच सर्वसामान्य जनता या बाबींना नजरेआड करतांना दिसून येत असून यात कोणाला जबाबदार धरावे हेच सांगणे कठीण आहे.
परंतु कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सामाजिक अंतर म्हणजे शारीरिक अंतर हे सहा फूट किंवा एक मीटर ठेवणे बंधनकारक आहे. परंतु दैनंदिन कामानिमित्त तसेच दररोजच्या रोजीरोटीसाठी प्रत्येकाला घराबाहेर पडणे अतिशय गरजेचे आहे. तसेच शालेय विद्यार्थी, नातलगांच्या काही ना काही कारणास्तव एकमेकांकडे येणे जाणे ही आवश्यक बाब असल्याने प्रवास करणे गरजेचे असते व प्रवासासाठी सुरक्षित साधन म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस.
म्हणून सगळेच एसटीतुन प्रवास करणे पसंत करतात परंतु बसेसची संख्या कमी असल्याने तसेच काही आगारचा कारभार रामभरोसे असल्याने प्रवाशांना वेळेवर बसेस मिळत नाही. व एखादी बस लागलीच तर प्रवासी संख्या जास्त असल्याने बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रवासी बसत असल्याने सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडाला आहे.
यात महत्वाची बाब म्हणजे एकाच एसटी बसमध्ये दाटीवाटीने प्रवास करणारे प्रवासी वेगवेगळ्या जिल्ह्यातील, राज्यातील व गावागावातील असतात व ते मुंबई, नागपूर, जळगाव, भुसावळ अश्या जास्त संखेच्या कोरोना प्रादुर्भाव झालेल्या गावातील असल्याने हा एसटीचा प्रवास एखाद्या प्रवाश्यांसाठी घातक ठरु शकतो तरी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरात व एसटीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.