पत्रकार दमदाटी प्रकरणी धरणे आंदोलन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट, कार्यवाही चे आश्वासन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०२/२०२१
खा. रक्षा खडसे व आ. चंद्रकांत पाटील यांची भेट
पोलीस अधीक्षकांना आठ दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन
रोजी बोदवड पोलीस ठाण्यात पत्रकार गोपाल व्यास यांना दमदाटी करत पोलीस ठाण्यात आल्यास पाहून घेईल असा दम देऊन दमदाटी करणारे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या निषेधार्थ दिनांक १७ बुधवार रोजी दुपारी बारा वाजेपासून काळ्या फिती लावून तहसीलदार कार्यालय समोर पत्रकार संघकडून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते.
सदर आंदोलन स्थळी खासदार रक्षा खडसे यांनी भेट देत पत्रकार सोबत अशी वागणूक करणाऱ्या पोलीस निरीक्षक चे कृत्य लोकशाहीला हानिकारक असून या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कार्यवाही करण्याचे पत्र देणार असल्याचे सांगितले. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी येत्या दहा दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांना दिले.
त्यानंतर मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट देत सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल देणार असून कार्यवाही चे आश्वासन दिले. तसेच तहसीलदार प्रथमेश घोलप यांना निवेदन देत सदर धरणे आंदोलन कार्यवाहीच्या आश्वासना नंतर मागे घेण्यात आले.
तसेच या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी येत्या काही दिवसात दखल घेत कारवाई न केल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्याचे प्रवीण सपकाळे यांनी सांगितले.
या आंदोलनाचे वेळी महेंद्र पाटील, पुरुषोत्तम गड्डम, नाना पाटील, गोपीचंद सुरवाडे, गणेश पाटील, विनोद शिंदे, अर्जुन आसने, नितीन चव्हाण, जितेंद्र गायकवाड, अमोल व्यवहारे, विकास पाटील, राजेंद्र शेळके, सुरेश कोळी, नंदलाल पठ्ठे, जफर मन्यार तेलंग, व बारा बलुतेदार संघाचे रवींद्र बावसकर, राष्ट्रवादी चे माजी तालुका अध्यक्ष लालसिंग पाटील,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी ही पाठिंबा दिला. असून या घटनेचा महाराष्ट्रभर निषेध व्यक्त केला जात असून योग्य कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांनी दिला आहे.