घरात प्रवेश करुन महिलेवर बलात्कार प्रकरणी, शेंदुर्णी येथील भाजपा नगरसेवक शरद बारी विरुद्ध गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०५/२०२३
सद्यस्थितीत महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात महिलांचा विनयभंग, अपहरण व बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून दिवसेंदिवस अश्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत असल्याने या नराधमांना कायद्याची भीती राहिली आहे किंवा नाही असा प्रश्न जनमानसातून विचारला जात आहे.
अशीच एक घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरातील महेश नगर भागात घडली असून एका लोकप्रतिनिधीने एकटी महिला घरात पाहून बळजबरीने अचानकपणे घरात प्रवेश करुन दरवाजा बंद करुन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला यावेळी संबंधित महिलेने आरडाओरड केला असता त्या महिलेचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत महिलेच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध करत बलात्कार केला तसेच या घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास मी तुला व तुझ्या मुलांसह संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकीन तसेच तुझी समाजात बदनामी करेल अशी धमकी दिली असल्याची घटना घडली असून याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला रीच सरगुणा नोंद झाल्याचे खात्री लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील भाजपाचे कार्यकर्ते व शेंदुर्णी नगरीचे नगरसेवक शरद बाबुराव बारी याने दिनांक २० मे २०२३ शनिवार रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथील महेश नगर मधील एका मुस्लिम महिलेच्या घरात बळजबरीने अनाधिकृतपणे प्रवेश करत एकटेपणाचा फायदा घेत बलात्काराचा प्रयत्न केला तेव्हा संबंधित महिलेने आरडाओरड करुन स्वताचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केला असता संबंधित नराधमाने महिलेचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करत बलात्कार केल्याची निंदनीय घटना घडली आहे. हा नराधम एवढ्यावरच थांबला नसून झाल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता किंवा तक्रार केल्यास तुला व तुझ्या मुलांसह संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
ही घटना घडत असतांना या घरात काहीतरी विपरीत घडत असल्याचे गल्लीतील लोकांच्या लक्षात आल्यानंतर शेजाऱ्या, पाजाऱ्यांनी शरद बाबुराव बारी या नराधमास रंगेहाथ पकडून येथेच्छ चोप दिला असता यावेळी शरद बारी याने गोंधळाचा फायदा घेत तेथून पळ काढला या घटनेमुळे महेश नगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटना घडल्यानंतर पीडित महिलेने लगेचच थेट पहूर पोलीस स्टेशनला जाऊन घडलेला प्रकार सांगितला हा घटनाक्रम ऐकून घेत पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन शरद बारी याच्या विरोधात भा. द. वी. कलम ३७६, ५०४, ४४८, ४५२ कलमान्वये गुन्हा दाखल करुन घेत पिडीत महिला व संशयित आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच डी. वाय. एस. पी. मा. श्री. भरतजी काकडे व पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थीतीची पाहणी करत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहेत.