सुमित किशोरआप्पा पाटील आयोजित जागर शक्तीचा उत्सव भक्तीचा नवरात्रोत्सवाचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०९/२०२२

पाचोरा, भडगाव मतदार संघाचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे सुपूत्र सुमित किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव येथील दहीहंडी, पाचोरा येथे गणेशोत्सवात साक्षात काशी विश्वनाथाचे दर्शन त्यास मिळालेला अभुतपुर्व प्रतिसादा नंतर येणार्‍या नवरात्रोत्सवात पाचोरा येथे दिनांक २६ सप्टेंबर सोमवार ते ०४ ऑक्टोबर मंगळवार २०२२ दरम्यान गरबा-दांडीयारास स्पर्धेचे आयोजन केले असुन आशिर्वाद इफ्राचे संचालक मुकूंदआण्णा बिल्दीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन ग्रिन अँपल इन्टेटस् यांच्या कडे देण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी दोन अक्टीवा, दोन फ्रीज, दोन टॅब, आठ मोबईल, दोन स्मार्ट ४२ इंची टि. व्ही, दोन वॉशिंग मशिन, दोन सायकली अंतिम फेरीतील विजेत्यांना देण्यात येणार आहे. या शिवाय दररोज देवीरूप माता, भगिनींसाठी मॅचिंग साडी असल्यास पाच पैठणी साड्यांची भेट आणि प्रेक्षकांन मधुन दररोज सहा प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या व्यक्तीस स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहे. या आकर्षक बक्षिसासोबतच प्रत्येक सहभागी स्पर्धकांस सर्वांना स्वतंत्र गिफ्ट देण्यात येणार आहे.

या गरबा दांडिया रास स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सा, रे, ग, म, प, विजेती वैशाली माडे यांच्या सुमधुर आवाजात गीतांचे बोल आणि गुजराती कच्ची ढोल वाद्यांच्या ठेक्यावर दांडीया, गरबा मध्ये स्वतः सहभाग घेऊन नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार आहेत आणि हो सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या उपस्थितीत भव्य आकर्षक बक्षीसांची लयलुट केली जाणार आहे. तरी नागरिकांनी व माता, भगिनींनी या नवरात्र उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या