पाचोरा नगरीत दिनांक २२ मे रोजी खानदेशातील ४२ वा निरंकारी संत समागम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२२
पाचोरा शहरात दिनांक २२ मे रविवार रोजी निरंकारी संत समागमाचे चे आयोजन करण्यात आले आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्व निरंकारी भक्त दरवर्षी खान्देश संत समागमात आयोजित करीत असतात. यावर्षी ४२ वा खानदेश निरंकारी संत समागम पाचोरा येथे वरखेडी रस्त्यावर असलेल्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर होणार आहे.
पाचोरा येथील मोहन छाबडा यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी सहा ते नऊ या वेळात निरंकारी भवन समोर जामनेर रोड पाचोरा येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. निरंकारी मंडळ हे आध्यात्मिक जागृती, सामाजिक कार्यात देखील योगदान देत आहे. यात रक्तदान शिबिराचे आयोजन, नशाबंदी, हुंडा बंदी, योग अभ्यास, नैसर्गिक आपत्तीत मदत, वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
इच्छुक भाविकांना ईश्वराची अनुमती, देवाची ओळख करून देण्यासाठी ब्रम्हज्ञान प्रदान करण्यात येणार आहे तसेच करण्यासाठी कार्यक्रमाचे ठिकाणी (लंगर) अन्नदान होईल तरी हजारो भाविक, भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हिरालालजी पाटील धुळे व महेशजी वाघ पाचोरा यांनी केले आहे.