शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाल्याने पाचोरा येथे जल्लोष.
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा~२४/०९/२०२२
सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब गट मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब गट हे छोट्या, छोट्या विषयावर एकमेकांच्या विरोधात अश्या पध्दतीने राजकारणात उतरले आहेत की लहानपणी शेंबडी मुल भांडतांना एकमेकांना वाकुल्या (जीभल्या) म्हणजे जीभ दाखवणे, अंगठे दाखवणे, एकमेकांना पाहून हातांची बोटे मोडणे अश्या पध्दतीने राजकीय विरोध सुरु आहे. यात ठाकरे गटाची भुमिका स्वच्छ असलीतरी समोरच्याला उत्तर देण्यासाठी जशास तसे उत्तर देण्यासाठी का होईना म्हणजे पायातील काटा काढण्यासाठी काट्याचाच उपयोग करुन जागेवर सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
परंतु पन्नास खोके घेऊन भाजपाशी हातमिळवणी करत सत्ता बळकावणाऱ्या शिंदे गटाला मात्र सगळीकडे आमच्याकडे सत्ता एके सत्ता आमचीच पाहिजे अशी हाव सुटली असल्याचे आरोप सुज्ञ नागरिक व सर्वसामान्य जनतेतून केले जात आहेत. याच वादा दरम्यान पुढे दसरा हा सण येत आहे. या दसरा सणानिमित्त शिवसेना स्थापन झाल्यापासून स्व. बाळासाहेब ठाकरे हे सत्ता असो किंवा नसो परंतु दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर आपल्या शिवसैनिकांसाठी व तमाम हिंदू बांधवासाठी मेळावा आयोजित करुन संवाद साधत होते. ही प्रथा आजतागायत सुरु आहे, सुरु राहील याबाबत तिळमात्र शंका नाही.
परंतु यावर्षी शिवसेनेत दोन गट तयार झाले व एक गट म्हणजे या. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांचा व दुसरा गट म्हणजे मा. श्री. एकनाथरावजी शिंदेचा गट हा शिंदे साहेबांचा गट जरी सत्तेवर असलातरी या गटाला सर्वसामान्य जनतेतून बंडखोर गट म्हणून संबोधले जाते आहे. याच दोन गटात शिवतीर्थावर आमचाच अधिकार आहे व आम्हीच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार या विषयावर वाद सुरु झाला हा वाद सुरवातीला मुंबई महानगरपालिकेकडे गेला होता परंतु शिंदे गटाच्या दडपशाहीला घाबरुन मुंबई महानगरपालिकेने भिजत घोंगडे ठेवल्यामुळे मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांनी न्यायालयात दाद मागितली परंतु न्यायालयीन कामकाज सुरु असतांना दसरा सण जसजसा जवळ येत होता तसतसा विरोध वाढत चालल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
याच चढाओढीत काल २३ सप्टेंबर २०२२ शुक्रवार रोजी मुंबई हायकोर्टाने संपूर्ण परिस्थीतीचा अभ्यास करून मा. श्री. उद्धवजी ठाकरे सरकारच्या बाजूने निकाल दिल्यानंतर हा न्यायालयाचा निकाल माहीत पडताच संपूर्ण महाराष्ट्रात सच्चा निष्ठावंत शिवसैनिक व शिवप्रेमी, ठाकरे परिवाला आपले मानणाऱ्या सर्वसामान्य जनतेतून नवचैतन्याची लहर उसळली व न्यायदेवतेचे शतशः आभार माणूस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कामानिमित्त परराज्यात गेलेल्या प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांनी फटाके वाजवून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
असाच जल्लोष पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेतर्फे सौ. वैशालीताई सूर्यवंशी जिल्हाप्रमुख मा. श्री. दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख मा. श्री. अभय दादा पाटील, तालुकाप्रमुख मा. श्री. शरद पाटील, मा. श्री. अरुण भाऊ पाटील, शेतकरी जिल्हा सेना प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली व सर्व शिवसैनिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पाचोरा तालुक्यातील तसेच शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.