शिवतीर्थ आणि दसरा मेळावा शिवसेनेचाच, जामनेर व पहुर येथे आनंदोत्सव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०९/२०२२

शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतून पन्नास खोके घेऊन काही बोक्यांनी गद्दारी करत भाजपाशी हात मिळवून अनाधिकृत सरकार स्थापन केलेले आहे. तेव्हापासून शिवसेना ही ठाकरे गटाची की गद्दार शिंदे गटाची याबाबतचा वाद न्यायालयात सुरु असतांनाच सत्ता असो किंवा नसो तरीही शिवतीर्थावर ठाकरे कुटुंबीय दसरा मेळावा घेत होते, घेत आहेत व घेत रहातील ही काळ्या दगडावरची रेघ असल्यावर ही यावर्षी या बंडखोर गद्दार शिंदे गटाने शिवसेना आमचाच पक्ष असून आम्हीच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार असल्याचा दावा केल्यामुळे ठाकरे गट व शिंदे गट यांनी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केले होते.

परंतु शिंदे गटाची झुंडशाही व दबावतंत्राला घाबरून मुंबई महानगरपालिकेने कोणताही निर्णय न घेतल्याने हा वाद न्यायालयात सुरु होता याबाबत न्यायदेवतेने दिनांक २३ सप्टेंबर २०२२ शुक्रवार रोजी ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे साहेबांना परवानगी दिली आहे. हा न्यायलयाने दिलेला निकाल हाच आमचा विजय असून या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक, शिवप्रेमींमध्ये नवचैतन्याची लाट उसळली आहे असे मत जळगाव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख डॉ. मनोहर दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हा न्यायालयीन निकाल माहीत पडताच जामनेर शहरात फटाके फोडून व मिठाई वाटप करुन मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला. या प्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजित मनोहर पाटील, तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे, शिवसेना जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, उपतालुकाप्रमुख अशोक जाधव, उपतालुका संघटक सुधाकर सराफ, उपशहर प्रमुख दिपक माळी, पहुर शहर प्रमुख संजय तायडे, मयुर पाटील, आनस खान, गणेश पाटील, सुकलाल बारी, आनिल पाटील, अमोल राजपूत, ईश्वर चोरडीया, भाऊराव गोंधनखेडे यांच्यासह अनेक शिवसैनिक व शिवप्रेमी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या