बंडखोर आमदार व काही नाराज शिवसैनिकांचा आँख मिचौली चा खेळ सुरु, पहले तुम, पहले तुम च्या प्रतिक्षेत अडकल घोंगड

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०७/२०२२
उसे यह ज़िद है कि मैं पुकारूँ, मुझे तकाज़ा है, वह बुला ले।
युध्दात व प्रेमात तसेच राजकारणात मतभेद, वादविवाद, संघर्ष हे अटळ आहे. परंतु सरतेशेवटी तह, समेट, मनोमिलन हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं, असे का म्हणतात याबद्दल बोलायचे झाल्यास सद्यस्थितीत आपण प्रेम हा विषय बाजूला ठेवून युध्दावर बोलुयात युद्ध, एक अशी प्रक्रिया जी अविरत चालूच असते, कधी उघड कधी लपून छपून. ज्यात जिंकणे हाच एकमात्र धर्म असतो, त्यासाठी मग सगळे डाव लावले जातात, छक्के पंजे खेळले जातात, कधी समोरच्याचा वजीर चोरला जातो कधी तो मारला जातो.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणात एक प्रकारे युध्दासारख्याच घटना घडत आहेत. परंतु हे शीतयुद्ध आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच राजकीय युध्दात सत्ताधारी आघाडीतील शिवसेनेचे आमदार मोठ्या संखेने भाजपा सोबत गेल्यावर मोठा भुकंप होऊन उलथापालथ व्हावी तसी राजकीय भुकंप झाल्यावर उलथापालथ होऊन आघाडी सरकारकाचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे हे एकटे पडल्याने आता सरतेशेवटी पक्षाच चिन्ह कुणाकडे याकरिता न्यायालयीन लढाई सुरु झाली असल्याचे समजते.
परंतु हे सत्ताधारी पक्षाचे आमदार शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजपाच्या गटात मिळाले असे सांगत असले तरी तेव्हापासून त्यांना बंडखोर आमदार म्हणून संबोधले गेले आहे. हे बंडखोर आमदार निघून गेल्यानंतर कट्टर, निष्ठावंत शिवसैनिकांनी तीव्र निषेध करत या आमदारांच्या विरोधात बंड पुकारले व यांच्यासोबत न रहाता शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवराव ठाकरे यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले होते.
याच कालावधीत शिवसेनेचे बंडखोर आमदार व भाजपचे आमदार यांनी सत्तास्थापन करुन सत्ता मिळवल्यानंतर बंडखोरी करुन पळून गेलेले आमदार आपापल्या मतदारसंघात परत आल्यावर त्यांनी आपले कामकाज नियमितपणे सुरु केले आहे. यात पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा आल्यानंतर पुन्हा कामकाज हाती घेतल्यापासून कालच त्यांनी पाचोरा तालुक्यातील व शहरातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा आढावा घेत योग्य त्या उपाययोजना व मदत करण्यासाठी प्रशासनाला सुचत करुन कामाला सुरुवात केली आहे.
याच कालावधीत आमदार किशोर आप्पा पाटील हे अचानकपणे निघून जात भाजपाशी हातमिळवणी केली म्हणून यांच्या निषेधार्थ कट्टर व निष्ठावंत शिवसैनिकांनी पाचोरा शहरात माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थनार्थ व बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी रॅली काढून आपला रोष व्यक्त केला होता. यामुळे पाचोरा, भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये दोन गट तयार झाले आहेत.
पैकी शिवसैनिकांचा गट बंडखोर आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत आहेत तर काही कट्टर, निष्ठावंत शिवसैनिकांनी किशोर आप्पा पाटील यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. परंतु आता जसजसा कालावधी लोटला जात आहे. तसतसं वातावरण निवळत चालल असल्याचे दिसून येत आहे. याच वातावरणात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांच्या गटातील (काही शिवसैनिक) आप्पासाहेबांच्या गटात सामील होण्यासाठी उत्सूक असल्याने त्यांच्यात व किशोर आप्पा पाटील यांच्यात चोरी, चोरी, चुपके, चुपके ऑंख मिचौलीचा खेळ सुरु झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
परंतु बंडखोर संबोधले जाणारे आमदार किशोर आप्पा पाटील व त्यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांपैकी (काही शिवसैनिक) एकमेकांना भेटून मनोमिलन करण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु सुरुवात करण्यासाठी दोघेही बाजुणे आपापली प्रतिष्ठा आड येत असल्याने ते सांगतील तर मी जाईल व ते येतील तर मी सोबत घेईल अश्या पेचात घोंगडं अडकल असल्याने (पहेले तुम, पहेले तुम) च्या प्रतिक्षेत सध्यातरी मनोमिलन लांबत असल्याचे खात्रीलायक वृत्त ऐकावयास येत आहे.
सरतेशेवटी ~ सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हटले जात असले तरी मात्र खरे, निष्ठावंत, कट्टर शिवसैनिकांनी मात्र या बंडखोर आमदारांचा निषेध करत शेवटपर्यंत मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सोबतच राहू असे जाहीर केले असून किशोर आप्पा पाटील हे मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत निष्ठावंत राहिले तर आमचाही विरोध नाही असे मत व्यक्त केले आहे.