वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नम्रता पॅनलच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/११/२०२३

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा बिगुल वाजला असून या गृप ग्रामपंचायत मध्ये कोकडी तांडा व वडगाव जोगे या गावांचा समावेश असून परिवर्तन पॅनल व नम्रता ग्रामविकास पॅनल मध्ये सरळ सरळ लढत आहे या निवडणुकीत काल नम्रता पॅनलने वडगाव आंबे येथील आराध्यदैवत श्री. अंबिका मातेला व पारिमांडल्य महानुभाव आश्रमातील महंत मोठे बाबा यांच्या उपस्थितीत श्री. चक्रधर स्वामींना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी जाबीर तडवी हे छत्री निशाणीवर व सदस्य पदांसाठी सौ. रुपाली चंद्रे ह्या ट्रॅक्टर निशाणीवर, सौ. सरला खैरनार ह्या बस, कलावती मराठे ट्रॅक्टर, कृष्णा पाटील बस, सौ. शितल पाटील पंखा निशाणीवर निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. असे असले तरी वडगाव आंबे गावातून सदस्य पदांसाठी पाच कोकडी तांडा येथील तीन व वडगाव जोगे येथील दोन उमेदवार असे एकूण दहा सदस्य निवडणूक रिंगणात उतरले आहेत व सरपंच पद हे अनुसूचित जाती जमाती साठी राखीव असून कोकडी तांडा व वडगाव जोगे येथील उमेदवारांनी सावध भूमिका घेत परिवर्तन पॅनल व नम्रता पॅनलला सोबत न घेता आपापल्या पध्दतीने स्वतंत्रपणे निवडणुकीत उडी घेतली असल्याने त्यांची भुमिका गुलदस्त्यात आहे. कालच्या या प्रचाराच्या शुभप्रसंगी गावातील बहुसंख्य महीला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्राचार रॅली मध्ये ॲडव्होकेट मंगेशराव गायकवाड माजी तंटामुक्ती अध्यक्ष पितांबर सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या