दिपक मुलंमुले (पाटील) यांचे डिजिटल मीडियामध्ये पत्रकारिता प्रशिक्षण पूर्ण, अभिनंदनाचा वर्षाव.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०९/२०२२
पिंपळगाव हरेश्र्वर येथील दिपलक्ष मराठी न्यूजचे संपादक व दैनिक देशदूत वृत्रपत्राचे प्रतिनिधी यांनी पत्रकारिता क्षेत्रातील प्रशिक्षण पूर्ण केले. सद्यस्थितीत डिजिटल मीडियाच्या युगात शिक्षण घेऊन पत्रकारिता करणे महत्वाचे असून सर्वत्र बोगस आणि तोतये पत्रकारांचा सुळसुळाट सुरु असल्याने समाजात योग्य रित्या काम करणाऱ्या पत्रकारांना देखील काम करणे फार कसरतीचे झाले आहे.
पत्रकारिता प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पिंपळगाव हरेश्र्वर येथील पत्रकार दिपक मुलमुले यांनी आपले डिजिटल मिडिया पत्रकारिता प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले असून याबाबत त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दिपक मुलंमुले यांनी मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन डिजिटल मीडिया जर्नलिजम, पत्रकार प्रशिक्षणा मध्ये वेब मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडिया बाबत शिक्षण घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले असून याबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.