मराठा समाजाच्या जळगाव जिल्हा संघटक पदी विलासराव चव्हाण (पाटील) यांची नियुक्ती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२३

जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील रहिवासी शिवश्री. विलासराव चव्हाण (पाटील) यांनी आजपर्यंत मराठा समाजाच्या हितासाठी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व समाजसेवेच्या केलेल्या कामांची दखल घेत समाजाच्या संघटन व उत्कर्षाची जबाबदारी देत मराठा समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दिलीप गायकवाड साहेब यांनी विलासराव चव्हाण (पाटील) यांची जळगाव जिल्हा संघटक प्रमुख या पदासाठी नियुक्ती केली आहे.

या नियुक्ती बद्दल जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाकडून तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या