सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन पाचोरा येथील खेळाडूंचे २०२३, २४ कराटे कलर बेल्ट परीक्षेत घवघवीत यश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२३
पाचोरा येथील सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी २०२३, २४ कराटे कलर बेल्ट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले यानिमित्ताने खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याच्या उद्देशाने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व विजयी विद्यार्थी खेळाडूंना कलर बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या गुणगौरव कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत दिप प्रज्वलन करण्यात येऊन ब्लॅक बेल्ट उत्तीर्ण शुभम गायकवाड, साक्षी पवार, तेजस्विनी निकावडे, पवन चांदा, श्रुती चौधरी, गायत्री चव्हाण, पर्पल बेल्ट उत्तीर्ण जान्हवी गौड, ग्रीन बेल्ट उत्तीर्ण ऐश्वर्या पाटील, पियुष राठोड, ऑरेंज बेल्ट उत्तीर्ण प्रणव पाटील, विनीत पवार, राधिका परदेशी, वेणूगोपाल पाटील, येल्लो बेल्ट उतीर्ण देवांश पुणेकर, दिव्यांश मिश्रा, अजिंक्य पाटील, राजशेखर पाटील, नयन पाटील अमृता जोशी यांना कलर बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तदनंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्षीय भाषणात पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेबांनी पाचोरा शहरात पाचोरा येथील सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशने कराटे प्रशिक्षण सारखे क्लासेस सुरु केले ही चांगली बाब आहे. यांच्या माध्यमातूनच आज या विद्यार्थ्यांनी कलर बेल्ट परीक्षेत घवघवीत संपादन केले याचे पूर्ण श्रेय सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन व क्रीडा शिक्षकाचे आहे असे मत व्यक्त केले.
तसेच आजच्या प्रगत युगात नवनवीन साधनांची भर पडत आहे. प्रगत युगात या साधनांचा वापर करुन आपली प्रगती साधली पाहिजे सांगायचे झाल्यास मोबाईल ही अशी जादूची छडी आहे की ‘सिम सिम खुल जा’ म्हणताच मोबाईलमध्ये असलेल्या विविध ॲपच्या माध्यमातून पाहिजे ती पुस्तके व सर्वप्रकारची माहिती क्षणात उपलब्ध करुन ती आत्मसात करु शकतो. परंतु आजच्या परिस्थितीत बरेचसे तरुण मोबाईल हे एक खेळणे म्हणून वापरतात मैदानी खेळ खेळण्याऐवजी मोबाईलवरच वेगवेगळे गेम खेळतात यामुळे व्यायामशाळा व खेळाचे पटांगण ओस पडली आहेत तसेच लहान वयातच मोबाईल हातात आल्याने डोळ्यावर तसेच सतत मोबाईल हातात घेऊन तासंतास बसल्याने मानेवर, पाठीवर त्याचे दुष्परिणाम होतात. व आपण मैदानी खेळ खेळण्यापासून लाब रहतो यामुळे शरीराची हानी होते.
खरे पाहता बालवयापासून आपण वेगवेगळे मैदानी खेळ खेळण्याचा सराव केला पाहिजे. यात कब्बडी, हू, तु, तु, खो, खो, जुडो, कराटे, धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे शरीरात नवीन उर्जा निर्माण होऊन शरीर सुदृढ व निरोगी राहते हे करत असतांनाच जिद्द, चिकाटी, मेहनत व ध्येय निश्चित करुन गुरु प्रती निष्ठा ठेवत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून आपण एक चांगला नागरिक म्हणून नावारुपाला आले पाहिजे. हे करत असतांनाच याला आध्यात्मिक व संस्कृतीची जोड देऊन सर्व व्यसनांपासून दूर राहुन शरीर संपत्तीचे जतन केले पाहिजे कारण गेलेला पैसा, धन, दौलत ही संपत्ती परत मिळवता येते मात्र शरीर हे पुन्हा प्राप्त करता येत नाही हे लक्षात घेतले पाहिजे असे मत राहुलजी खताळ यांनी व्यक्त केले.
यशाला कुठलाही शॉट, कट नसतो तसेच वेळ व संधी निघून गेल्यावर ती संधी पुन्हा, पुन्हा मिळत नाही. म्हणून योग्य वेळी ध्येय, चिकाटीने यश संपादन केले पाहिजे. तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलगा आणि मुलगी असा भेद न करता मुला, मुलींना मैदानी खेळ, जुडो, कराटे व इतर खेळ शिकवले पाहिजे व खेळ खेळु दिले पाहिजे म्हणजे आपली आपली भावी पिढी ही सक्षम, सुदृढ घडेल अशी अपेक्षा व्यक्त करत सेन्साईचे मुख्य शिक्षक प्रकाश निकुंभ सर, सेन्साई प्रविण मोरे (पाटील) सर यांनी मागील १५ वर्षांपासून पाचोरा शहरात अथक परिश्रमाने उत्कृष्टपणे कराटे खेळाचा प्रचार व प्रसार केला म्हणूनच पाचोरा शहरातील या विद्यार्थ्यांना आज माझ्या हस्ते गौरविण्यात आले याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन खेळाडूंसाठी आयोजित कार्यक्रमाला कार्याध्यक्ष मा. श्री. रणजित पाटील, सचिव मा. श्री. राजेंद्र पाटील, खजिनदार मा. श्री. मधुसुधन पाटील, पोलीस मा. श्री. योगेश पाटील, मा. श्री. समीर दादा, पालक व विद्यार्थीवर्ग तसेच प्रतिष्ठीत मान्यवर व बहुसंख्य नागरिक हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनया जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी केले.