पोलीस निरीक्षक किरण बकालेवर कठोर कारवाई होणारच, अजितदादा पवार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०९/२०२२
जळगाव एल. सी. बी. कार्यालयात पोलीस निरीक्षक पदी कार्यरत असलेले किरण बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरुन मराठा समाजाला चीड येईल असे वक्तव्य केले असल्याने या पोलीस निरीक्षक किरण बकालेला त्वरित बडतर्फ करुन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाचोरा तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार हे पाचोरा येथे दौऱ्या निमित्ताने आले होते. यावेळी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा सह अखिल भारतीय मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन जळगाव येथील एल. सी. बी. कार्यालयात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त असलेले किरण बकाले यांनी मराठा समाजाबद्दल काय भाष्य केले आहे याची भ्रमणध्वनीवर संभाषण झालेली ध्वनी फीत ऐकवून मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरुन मराठा समाजाला चीड येईल असे कृत्य केले असल्याने त्यांना फक्त निलंबित न करता सखोल चौकशी करून कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करावे व केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्यावर कठोरात, कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक मा. श्री. सचिन दादा सोमवंशी, अखिल भारतीय मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, संजय पाटील, राकेश सोनवणे, नितीन पाटील, गणेश पाटील, लकी पाटील, सचिन पाटील, राहुल शिंदे, दिगंबर पाटील, किशोर पाटील, कल्पेश येवले व बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते.
संबंधित बेताल वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण बकालेवर कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही निवेदन स्वीकारल्यानंतर मा. श्री. अजितदादा पवार यांनी दिली आहे.