उद्या पाचोरा येथे शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२३
पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन उद्या दिनांक २७ मे २०२३ शनिवार रोजी सकाळी साडेदहा वाजता शिवालय संपर्क कार्यालयात करण्यात आले आहे.
तरी पाचोरा, भडगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख पाचोराचे मा. श्री. गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रमुख भडगावचे मा. श्री. डॉ. विशाल पाटील, पाचोरा तालुकाप्रमुख मा. श्री. सुनील पाटील, पाचोरा शिवसेनचे शहरप्रमुख मा. श्री. किशोर बारावरकर, पाचोरा शिवसेनचे शहरप्रमुख बंडु भाऊ चौधरी, भडगावचे तालुकाप्रमुख संजय पाटील उर्फ (भुरा आप्पा), मा. श्री. आबा चौधरी, योगेश गंजे यांनी केले आहे.