कुऱ्हाड खुर्द गावात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची झाडाझडती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव सध्या अवैधंद्यांमुळे गाजत असून या गावात दररोज नवनवीन किस्से घडत आहेत. याची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कंबर कसली असून आज कुऱ्हाड येथील आठवडे बाजार असल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक मा श्री. कृष्णा भोये साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुऱ्हाड येथे अचानकपणे धाडसत्र सुरु केल्यामुळे अवैधधंदे करणारांना पळताभुई थोडी झाली असल्याचे दिसून येते.
पिंपळगाव पोलिसांनी अवैधधंद्याचे विरोधात कारवाईचा बडगा उगारल्यामुळे कुऱ्हाड ग्रामस्थ व माता भगिनींनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे आभार माणले आहेत. व सतत अशीच कारवाई करून आमच्या गावातील अवैधधंदे कायमस्वरूपी बंद केल्यास आम्ही पोलिसांचा जाहीर सत्कार करू अशी भावना बोलून दाखवली.
परंतु एकाबाजूला पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली असली तरी गावठी दारू विक्रेते व सट्टा बॅटिंग वाल्यांनी नामी शक्कल लढवून मोबाईलवर तसेच स्कूटर व सायकलवरून चालती फिरती सट्टा बेटिंग व गावठी दारुचे पाऊच (पोतरी) प्लॅस्टिक थैलीतुन गावठी दारू तसेच खिशात देशी दारुच्या बाटल्या घेऊन गल्ली बोळात विकत आहेत.
परंतु सतत कारवाई सुरु असल्याने महिलावर्ग आनंदीत झाला आहे.
विशेष बातमी क्रमशः
(पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी रोजंदारीवर खबऱ्यांची नियुक्ती)