वडगाव आंबे ग्रुप ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष, पत्रव्यवहार करतांना तारखेचा विसर, गावठी डुकरांचा बंदोबस्त करणार कोण ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षांपासून चाललेला कारभार म्हणजे फक्त रामभरोसे दिसून येते आहे. कारण वडगाव आंबे गावातील ग्रामस्थांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांच्याकडे किंवा ग्रामसेवकाकडे वारंवार जाऊन अर्जफाटे व तोंडी तक्रारी करुनही ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.
याबाबत महत्वाची समस्या म्हणजे मागिल चार वर्षांपासून वडगाव आंबे गावात गावठी डुकरांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली असून ही डुकरे गावाच्या जवळपास असलेल्या शेतात घुसून पिकांचे नुकसान करतात तसेच वडगाव आंबे या गावात संपूर्ण शेतकरी व मजूर वर्ग असल्याकारणाने हे शेती कामानिमित्त सकाळीच शेतात गेल्यानंतर ही गावठी डुकरे गावभर हिंडून घराच्या ओट्यावर, ओसरीवर तसेच गोरगरिबांच्या झोपडीत दरवाजे ढकलून घुसतात व धनधान्याची नासाडी करतात.
याबाबत वडगाव आंबे ग्रामपंचायतीकडे आंदोलनाचा इशारा देऊनही काहीएक फायदा होत नसल्याने तसेच डुकरांचा बंदोबस करण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे विचारले असता संबंधित ग्रामसेवकांनी मागील आठ दिवसांपूर्वी लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. मात्र त्या ग्रामपंचायतीने दिलेल्या खुलासा पत्रावर तारीख (दिनांक) नसल्याने ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा अनुभव येत आहे.
तसेच डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याने ग्रामपंचायतीने कारवाई करुन संबंधित डुकरांच्या मालकावर कारवाई करणे तो ऐकून घेत नसेल तर त्या डुकरांचा जाहीर लिलाव करुन गावातील डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.