कुऱ्हाड येथील आदर्श विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबिर संपन्न.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~१७/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुर्हाड खुर्द येथे आज सकाळी १५ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण प्रतिबंधक शिबिर पार पडले. सध्या कोरणा चा वाढता प्रादुर्भाव व तिसरी लाट थोपविण्यासाठी शासनाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी , मुले व मुलीसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेशान्वये आज दिनांक १७ जानेवारी २०२२ सोमवार रोजी सकाळी १० वाजता कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात लसीकरण शिबिर राबविले. यावेळी नववी व दहावीच्या एकूण १९५ विद्यार्थ्यांना लसीकरणाची मात्रा देण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन या शाळेचे चेअरमन सतीश चौधरी व मा. जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, सरपंच कैलास भगत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लसीकरण होत असताना एखाद्या विद्यार्थ्याला काही त्रास जाणवल्यास याठिकाणी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भास्कर बोरुडे, शिक्षिका सौ.विमल वानखेडे,श्रद्धा पाटील, शिक्षक सुहास मोरे, सुधाकर गायकवाड ,प्रदीप पाटील,चेतन पाटील, संदीप पाटील,शरद महाजन ,राजेंद्र माळी, व आदी शिक्षक वर्ग तसेच कुऱ्हाड आरोग्य उपकेंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी इमूउद्दीन शेख, आरोग्य सेवक श्री. राठोड ,आरोग्य सेविका रंजना पंडित व आशा स्वयंसेविका यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.