कुरंगी, बांबरुड गटात पहिल्यांदाच विकास कामांचे आमदार यांच्या हस्ते जल्लोषात उद्घाटन संपन्न.
नगराज पाटील.(नांंद्रा ता.पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२३
पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील गावागावात विकासाची गंगा गंगा आणली असून या माध्यमातून गावागावातील अनेक समस्या सोडवण्यासाठी व विकासकामे करण्यासाठी विडा उचलला आहे. यातुनच
पाचोरा तालुक्यातील बाबरुड गटातील कुरंगी या गावात दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रविवार रोजी पहिल्यांदाच आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या उद्घाटन सोहळ्याचे अगोदर अतिथी देवो भव या भावनेतून पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, कुरंगी बांबरुड माजी जिल्हापरिषद सदस्य पदमसिंह पाटील, भडगावचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, बापू पाटील, चंद्रकांत धनवडे, सरपंच सौ. सीमाताई नगराज पाटील, सौ. मनीषाताई पाटील, सौ. मंगलाताई पाटील, आजी माजी व विद्यमान सरपंचांनी आमदार किशोर पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यात आमदार निधीतून कुरंगी गावातील रस्ते कॉंक्रिटी करण्यासाठी दहा लाख रुपये, जल जीवन, जल मिशन योजनेअंतर्गत दोन कोटी ७७ लाख ६२ हजार रुपये, कुरंगी गावाचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. साई मंदिरासमोर डोम उभारणीसाठी दहा लाख रुपये, व्यायामशाळेत साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी पाच लाख रुपये असा निधी उपलब्ध करुन देत कुरंगी गावाच्या तंटामुक्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते व जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शालिग्राम पाटील, योगेश पाटील, दिनकर सोनवणे, अविनाश कोळी, ग्रामसेवक आबासाहेब पाटील, पंढरीनाथ पाटील, गणेश पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पत्रकार नगराज पाटील, नांद्रा येथील राजेंद्र पाटील यांच्यासह या कामांचे ठेकेदार किरण पाटील, डॉ. हेमराज पाटील यांच्यासह कुरंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार नगराज पाटील यांनी मानले.