अटलगव्हाण धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला तडे पाणी वाहून जात असल्याने शेतकरी हतबल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील अटलगव्हाण हे गाव जळगाव जिल्ह्याच्या शेवटी व मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेले गाव आहे. या गावाजवळ नांदोळ नदीवर धरण बांधण्यात आले असून या धरणाला अटलगव्हाण धरण म्हणून ओळखले जाते. हे धरण बांधण्यात आल्या पासून अटलगव्हाण, माळेगाव पिंप्री, कोल्हे व मोठ्या लोकसंख्येच्या पिंपळगाव हरेश्र्वर येथील कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होऊन शेती उत्पन्न वाढले होते. तसेच गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता.
परंतु या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे बांधकाम करतांना संबंधित ठेकेदाराने कमी प्रमाणात सिमेंट वापरुन व जवळच्याच नाल्यातील मातीयुक्त वाळू (रेती) वापरुन मनमानीपणे काम केले आहे. हे बांधकाम सुरु असतांनाच अटलगव्हाण व पिंपळगाव हरेश्र्वर येथील सजग नागरिकांनी या कामा बाबतीत आक्षेप घेतला होता. परंतु संबंधित ठेकेदाराने या कामात मठा भ्रष्टाचार केल्यामुळे धरण बांधल्यानंतर काही वर्षांतच या सांडव्याच्या भिंतीला तडे जाऊन मोठ, मोठे भगदाड पडले आहेत.
सांगण्याच्या भिंतीला तडे गेल्याने पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी.
या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडून तडे गेल्याने पावसाळ्यात येणारे पावसाचे पाणी धरणात येते तसेच वाहून जात असल्याने हे धरण असुनही नसल्यासारखे आहे. कारण या धरणाचा सांडवा अगोदर सुस्थितीत होता तेव्हा अटलगव्हाण, पिंपळगाव हरेश्र्वर, माळेगाव पिंप्री तसेच कोल्हे गावाचे शेतकरी या धरणाच्या पाण्यावर रब्बीची पिके घेत होते. सहाजिकच त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली होती. परंतु मागील तीन वर्षांपासून धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला तडे गेल्याने संपूर्ण पाणी वाहून जात असल्याने ऐनवेळी हिवाळ्यात पिकांना पाणी देण्यासाठी टंचाई जाणवते व हक्काचे हिवाळी पिक वाया जात असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न घेता येते नाही.
म्हणून आता पावसाळा सुरु झाला असला तरी सांडव्याच्या भिंतीपर्यंत पाणी येण्यासाठी अजून सहजपणे २० ते २५ दिवसाचा कालावधी लागू शकतो म्हणून आतातरी पाटबंधारे विभागाने तातडीने या अटलगव्हाण धरणाच्या सांडव्याच्या भिंतीची त्वरित डागडुगी करावी म्हणजे अटलगव्हाण, कोल्हे, माळेगाव पिंप्री व पिंपळगाव हरेश्र्वर येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच गुराढोरांना पाणी पाजण्यासाठी फायदा होईल असे मत वरील चारही गावातील शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूजकडे व्यक्त केले आहे.