खडकदेवळा येथील अनाधिकृतपणे काढण्यात आलेले प्रवाशी शेड त्याच जागेवर बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१०/२०२२
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन स्थानिक विकास योजने अंतर्गत बांधण्यात आलेले प्रवाशी निवारा (शेड) हे गावातीलच काही मंडळींच्या सांगण्यावरुन व आर्थिक लाभासाठी तोडण्यात आल्याने प्रवाशी निवारा (बस स्टॅण्ड) नसल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांना ऊन, वारा, पाऊसात एस. टी. बस येईपर्यंत ताटकळत उभे रहावे लागत असल्याने अतोनात हाल होत आहेत. म्हणून अगोदर बांधण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याच्या जागेवरच पुन्हा प्रवासी निवारा तात्काळ बांधून मिळावा या मागणीसाठी खडकदेवळा येथील तरुण तडफदार अजय साहेबराव पाटील, रविंद्र लक्ष्मीकांत सोनवणे व डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी गांधी जयंतीच्या म्हणजे दिनांक ०२ ऑक्टोबर रविवार पासुन शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केले आहे.
(व्हिडिओ पहा व सबस्क्राईब करा ही विनंती.)
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील मौजे खडकदेवळा येथे पाचोरा गोंदेगांव रस्त्यावर स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रवासी निवारा, शेड, (बसस्टण्ड) बांधण्यात आले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक १८ मे २०२२ रोजी अतिक्रमण हटाव मोहीमेअंर्गत प्रवाशी निवारा, शेड (बस स्टॅण्ड) तोडुन टाकले. त्यामुळे शासनाचा निधी वाया गेला आहे. सदरचा प्रवाशी निवारा, शेड, (बस स्टॅण्ड) हे सुनिल युवराज पाटील, अनिल विश्राम पाटील व दिलीप वाघ यांच्या सांगण्यावरून आर्थिक गैरव्यवहार करून काही एक तक्रार नसतांना ते तोडुन टाकलेले आहे.
सदरचे बस स्टॅण्ड तोडुन टाकल्याने प्रवाशी तसेच शाळेत जाणारे विदयार्थी यांना थांबण्यासाठी व सावलीसाठी निवारा नाही. सध्या पाणी पावसाचे दिवस आहेत. परिसरातील विदयार्थी शाळेत ये, जा करतात, पावसामुळे कामे नसल्यामुळे उन, पाणी व वारा यात उघडयावर थांबावे लागत आहे. त्यामुळे गैरसोय झालेली आहे. म्हणुन पुनच्छ त्याच जागेवर प्रवासी निवारा बनविण्यात यावा यासंदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार अर्ज करुन देखील कुठलीच कारवाई होत नसल्याने अजय साहेबराव पाटील, रविंद्र लक्ष्मीकांत सोनवणे सह खडकदेवळा व डोंगरगाव येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
(खडकदेवळा येथील प्रवासी निवारा पाडून त्या जागेवर काही संधीसाधूंनी अतिक्रमण करुन ती जागा बळकावण्यासाठी संबंधित अधिकारी यांच्याशी संगनमत करून व आर्थिक देवाणघेवाण करुन प्रवासी निवारा पाडण्यासाठी कटकारस्थान केले असल्याची चर्चा खडकदेवळा गाव, परिसरातील नागरिकांतून दबक्या आवाजात ऐकू येत आहे.)