सावखेडा येथील ४२ वर्षीय तरुण मजुराचा नदीपात्रात बुडून मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील एक भूमिहीन, बेघर ४२ वर्षीय तरुण शेतमजूराचा पाय घसरून नदीपात्रात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील भूमिहीन, बेघर ४२ वर्षीय शेतमजूर शंकर मोहन गोपाळ हा दिनांक ०२ जून २०२२ गुरुवर रोजी मजुरीसाठी जात असतांना गावाजवळील बहुळा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने नदीपात्रातील डोहात पडला होता तो पाण्यात पडत असतांनाची घटना एका लहान मुलाने पाहताच त्याने गावात धाव घेऊन शंकर नदीपात्रातील डोहात पडल्याचे सांगितले.
ही घटना माहीत पडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पोहणाऱ्या मुलांनी खोल पाण्यातून शंकर गोपाळ यास बाहेर काढले व तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता किंवा नियतीला ते मान्य नव्हते शंकर यांची तपासणी करत पाचोरा ग्रामीण रुग्णालये वैद्यकीय अधिकारी डॉ. मा. श्री. अमित साळुंखे यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोहन शंकर गोपाळ यांच्या पाश्चात वृध्द आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. शंकर हा भूमिहीन, बेघर शेतमजूर असल्याने दररोज कामाला गेल्यानंतरच घरातील चुल पेटत होती व सगळ्यांच्या पोटाची आग शांत होत होती. परंतु शंकरच्या आकस्मिक निधनाने आता वृध्द आईचा, पत्नी, मुलाबाळांच्या पोशिंदा निघून गेल्यामुळे या परिवारावर दुःखांचा डोंगर कोसला आहे.
म्हणून या परिवारातील सदस्यांना शासनदरबारी काही मदत मिळेल का ? यासाठी गावचे सरपंच, पोलीस पाटील, तालुक्याचे आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करुन फुल नव्हे तर फुलाच्या पाकळीच्या स्वरूपात मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत जनमानसातून व्यक्त केले जात आहे.