जैन साध्वी ज्ञानमती माताजी राष्ट्रपतिभवनात कुसुंबा जैन समाजात आनंदोत्सव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२१
कुसुंबा जवळील ८० किमी अंतरावर असलेले दिगंबर जैन बांधवांचे पवित्र सिद्धक्षेत्र मांगीतुंगी जी येथे ज्यांच्या प्रेरणेने जगात सर्वोच्च उंच असलेली १०८ फुटाची भगवान आदिनाथांची अखंड पाषाणात मूर्ती साकारली गेली व त्याची नोंद Guinness World record मध्ये नोंदविण्यात आली होती. अशा महान तपस्वी आर्यिका ज्ञानमती माताजी आणि चंदना मती माताजी यांनी नुकतीच राष्ट्रपती भवनाला भेट दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार भारताचे राष्ट्रपती मान्यवर महोदय श्री रामनाथ कोविंद यांच्या विशेष आग्रहामुळे जैन समाजाच्या सर्वोच्च साध्वी भारत गौरव गणिनी प्रमुख अर्यिका ज्ञानमती माताजींच्या संघाचा प्रवेश राष्ट्रपती भवनात १४ नोव्हेंबरला झाला होता अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंती लाल जैन कुसुंबा आणि गौरव उल्हास जैन यांनी दिली
त्यावेळी माताजींनी जनकल्याण व अहिंसा धर्मावर प्रवचन दिले आणि सर्वांना आपले मंगल मय आशीर्वाद प्रदान केले. जैन साध्वी चे राष्ट्रपती भवनात प्रथमच प्रवेश केल्यामुळे कुसुंबा जैन समाजात आनंद व्यक्त होत आहे या अगोदर संत शिरोमणी दिगंबर आचार्य विद्यासागर जी महाराज तसेच राष्ट्रसंत कडवे प्रवचन देणारे मुनिश्री तरुण सागर जी महाराज प्रवचनासाठी विधान भवनात गेले होते. या आनंदोत्सवात महेंद्र हिरालाल जैन,पारस नवणीतलाल जैन, स्वप्नील महेंद्र जैन, वालचंद रतनलाल जैन, अभय पन्नालाल जैन, पत्रकार रमेश जैन पारोळा आदी समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.