पाचोरा शहरातील भारत डेअरी परिसरात उभी असलेली दुचाकी चोरट्यांनी केली लंपास.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०६/२०२३
पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील भारत डेअरी जवळील शरद ट्रेडिंग कंपनी समोर असलेल्या चौधरी ऑफसेट प्रिंटिंग प्रेस दुकानासमोर उभी असलेली मोटरसायकल आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेले असल्याची घटना घडली आहे.
मोटारसायकल चोरटा सी.सी.टी.व्ही. कॅमेरा कैद.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील भारत डेअरी जवळील शरद ट्रेडिंग कंपनीच्या समोर अशोक चौधरी यांच्या मालकीचे चौधरी ऑफसेट प्रिंटिंग प्रेस असून याठिकाणी अशोक चौधरी व त्यांचा मुलगा सागर अशोक चौधरी हे ऑफसेट दुकान चालवून आपला उदरनिर्वाह चालवतात. सागर चौधरी हे सकाळी नियमितपणे त्यांच्या मालकीची बजाज कंपनीची १२५ सी. सी. पल्सर मॉडेल असलेली मोटारसायकल क्रमांक एम. एच. १९, डी. झेड. ०३६८ घेऊन आले व त्यांच्या ऑफसेट दुकानासमोर मोटारसायकल उभी करुन ऑफसेट दुकानात काम करत होते.
(चोरीला गेलेली मोटारसायकल सागर चौधरी यांनी काढलेले संग्रहित छायाचित्र या वर्णनाची मोटारसायकल आढळून आल्यास पाचोरा पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क साधावा.)
याच कालावधीत सागर चौधरी यांचे वडील दुकानाबाहेर सहज आले व मोटारसायकल शोधु लागले परंतु सागर चौधरी यांनी ज्या ठिकाणी मोटारसायकल उभी केली होती येथे गाडी आढळून न आल्यामुळे दुकानाजवळील परिसरात शोधाशोध केली परंतु मोटारसायकल कुठेही मिळून न आल्यामुळे आपली मोटारसायकल चोरीला गेल्याची पुर्ण खात्री झाल्यावर सागर चौधरी यांनी लगेचच पाचोरा पोलीस स्टेशनला जाऊन सर्व हकीकत सांगितली व १८०,००० किंमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे.
मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली असून याबाबत अधिक चौकशी केली असता चौधरी ऑफसेट दुकानाच्या आजूबाजूला चौकात लावलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात मोटारसायकल चोरटा दिसून येत आहे. त्या अनुषंगाने पाचोरा पोलीसांनी चोरट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.