गरुड महाविद्यालयाचे युवारंग स्पर्धेत दोन पदकं मिळवून नेत्रदीपक यश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०४/२०२२
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान युवारंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी उत्साहात सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत वी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित अप्पासाहेब रघुनाथराव भावराव गरुड महाविद्यालयाच्या संघाने हिरीरीने भाग घेत या सुवर्णसंधीचा फायदा घेत कोविड १९ या विषयाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कलेतून सादरीकरण करुन कु. सुमित्रा पाटील हिने व्यंगचित्र कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करुन रजत तसेच कु. गायत्री पाटील, कु. स्नेहल वाघ, चि. भुषण हिवाळे, कु. धर्मेश्वरी गुजर यांच्या संघाने इंस्टोलेशन ह्या कलाप्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत कांस्य पदक मिळवून नेत्रदीपक यश संपादन करुन महाविद्यालयाचे नावलौकिक केले.
या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण दहा विद्यार्थ्यांचा संघ हिरीरीने सहभागी झाला होता. त्यात अंजलीका हटकर, महेंद्र घोंगडे, अक्षय पवार, स्वप्नील जाधव व कु. रंजना कुमावत यांनी इतर कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करुन सहभाग घेतला. महाविद्यालयातील संघाने विडंबन, माईम, मिमिक्री, मेहंदी, वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धेत सुद्धा ताकदीचे चांगल्याप्रकारे सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
या संघाचे संघव्यवस्थापक व मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ए. एन. जिवरग व महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगिता चौधरी यांनी अथक परिश्रम घेत आपली जबाबदारी सांभाळली. तसेच आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. दिनेश प्रकाश पाटील यांनी सुद्धा युवारंग आयोजन समिती सदस्य म्हणून उपस्थिती देऊन संघास मोलाचे सहकार्य केले. या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब मा. श्री. संजयजी गरुड, सचिव मा. श्री. सतिषजी काशीद, महिला संचालिका सौ. उज्ज्वलाताई काशीद, सहसचिव मा. श्री. दीपक गरुड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर. पाटील यांनी सहभागी व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील महाविद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल परिसरातून आनंद व्यक्त केला जात असून सहभागी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.