कुऱ्हाड बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सह सोसायटीच्या निवडणुकीत, सहकार पॅनलचा एकतर्फी विजय.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२४/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणूकीत १३ जागेसाठी सरळ दोन पॅनल मध्ये लढत होती. भाजपचे माजी सरपंच मा. श्री. किरण पाटील यांच्या नेतृत्वात एकता सहकार पॅनल तर विद्यमान ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व त्यांचे सहकारी यांच्या शेतकरी विकास पॅनल मध्ये समोरासमोर चुरशीची सरळ लढत होती. काल दिनांक २३ एप्रिल २०२२ शनिवार रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी १९६ मतदात्यांपैकी पैकी १७४ उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या लढतीत एकता सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व अकरा जागा निवडून आल्या. यापूर्वी सहकार पॅनलच्या दोन जागा अगोदरच बिनविरोध झालेल्या होत्या.
विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण जागेत शांताराम धनगर, तुकाराम पाटील, कमृद्दिन मुसलमान, लखा हटकर, रामसिंग राठोड, छलो बाई वंजारी, सावजी वंजारी, विजय वंजारी तर महिला राखीव मध्ये अनिता पाटील व कमलबाई पाटील, इतर मागास वर्ग व अनुसूचित जमाती तील एक एक जागा बिनविरोध तर भटके जमातीत शिवाजी पाटील विजयी झालेत. आमदार तथा माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन ,संजय शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच किरण पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडली. निवडणुकीसाठी पवन पाटील, शालिक पाटील, विलास पाटील, सुरेश पाटील, नामदेव पाटील, तुकाराम बंजारा, इंद्रजीत वंजारी, लक्षमण वंजारी, आप्पा झाडे, अमोल पाटील, बाबूलाल पाटील व भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.