शेतकरी सहकार विकास पॅनलचा एकच ध्यास, संस्थेचा सर्वांगीण विकास.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक १७ एप्रिल २०२२ रविवार रोजी होत आहे. सभासदांच्या हितासाठी व संस्थेच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही शेतकरी सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत असून सोसायटीच्या सभासदांनी आम्हाला जास्तीत जास्त मतदान करुन आपल्या सोसायटीच्या भरभराटीला हातभार लावून आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले आहे.
तसेच आजपर्यंत केलेल्या कामांचा व प्रगतीचा आराखडा मांडला असून पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे. यात शेती आणि शेतकरी यांच्या कल्याणासाठी आपल्या कुऱ्हाड खुर्द विविध कार्यकारी विकास सोसायटीची स्थापना दिनांक १९/०४/१९२० रोजी झालेली असून इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे. या वटवृक्षाला स्वार्थी व संधी साधूची वृत्तीची किड लागू नये याची खबरदारी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आमच्या पॅनलवर जी जबाबदारी दाखविली व जो विश्वास टाकला तो आम्ही सार्थ करून दाखविला आहे. याचे जीवंत उदाहरण म्हणजे सोसायटीच्या जागेमध्ये मालकी हक्काचे सहा व्यापारी गाळे बांधून गरजू तरुणांना उद्योग उभारणीसाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच बँकेच्या बाजूने खाली पडलेल्या संस्थेच्या जागेला स्वतंत्र दरवाचा पाडून गरजू तरुणाला भाडे तत्त्वावर गाळा उपलब्ध करून दिला आहे.
अशा माध्यमातून संस्थेचे उत्पन्न वाढविले. आम्हाला सांगतांना आनंद वाटतो की आम्ही तुमच्या आशीर्वादाने व सहकार्याने तुम्ही दाखविलेल्या अतुट विश्वासावर आता देखिल संस्थेचा कारभार सांभाळत आहोत. या पंचवार्षिकमध्ये उत्कृष्ठ असे संस्थेचे ऑफीस कुठलेही कर्ज न घेता बांधकाम केले तसेच संस्थेची मालकी हक्काची भरचौकात असलेली जुनी इमारत पाडून प्रशस्त असे दोन मजली व्यापारी संकुल बांधून गावातील शेतकऱ्यांच्या सुशिक्षीत मुलांना व्यापार, व्यवसायासाठी बांधून देण्याचा मानस विद्यमान संचालक मंडळाचा होता. परंतू काही स्वार्थी व संधीसाधू वृत्तीच्या लोकांनी या विकास कामांना अडथळा निर्माण केला. वास्तविक पाहता जीर्ण झालेली इमारत पाडून संस्थेवर कुठलाही प्रकारचे कर्ज न घेता दोन मजली व्यापारी संकुलन बांधण्याचा मानस आमचा होता. परंतू काही संस्थेच्या हिताआड येणाऱ्या लोकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे हस्तक्षेप करत होवू घातलेले काम बंद पाडण्यात आले.
कारण वरिष्ठ कार्यालयाच्या मते आमच्या कार्यकाळाची मुदत संपलेली असल्याचे कारण पुढे करत तुम्हाला विकास कामे करता येणार असे पत्र देवुन त्या कामाला स्थगिती दिली आहे. म्हणून आम्ही सर्वांनी त्याच दिवशी निर्धार केला व आपण सर्वजण मतदार बंधू भगिनींन समोर जावून पुन्हा सेवेची संधी देण्यासाठी आम्हाला निवडणुकीत मतदान करुन अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना जागा दाखवण्यासाठी व संस्थेच्या सोबतच शेतकरी व गावाच्या प्रगतीसाठी शेतकरी सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत असून आम्हाला निवडून द्यावे अशी विनंती करणार असून संस्थेचे सभासद नक्कीच आम्हाला निवडून देतील याबद्दल आम्हाला पुर्ण विश्वासच नव्हे तर खात्री आहे. असे ठामपणे मत मांडून एक वचन नामा जाहीर केला आहे. तो पुढीलप्रमाणे सर्व सभासदांना खालीलप्रमाणे लिहून देत आहोत. तो पुढीलप्रमाणे~
१) संस्थेच्या मालकीच्या हक्काच्या जागेवर विना कर्ज घेता दोन मजली प्रशस्त व्यापारी संकूल बांधणार.
२) संस्थेच्या मालकी हक्काचा खत विभाग पूर्ण क्षमतेने चालविणार.
३) किटकनाशक विभाग सुरू करणार
४) संस्थेच्या धान्य विभाग व्यापती वाढविणार
५) आज देखील संस्थेच्या धान्य दुकाना च्या माध्यमातून आम्ही आठ लाख रूपयाच्या ठेवची पावती केली आहे व दोन लाख रूपये खेळते भांडवल संस्थेकडे आहे.
६) संस्थेच्या हितासाठी अजून काही उद्योग निर्माण करण्याचा आमचा मानस आहे.
वरील वचन नामा पूर्तीसाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल यात तीळमात्र शंका नाही. शून्य राजकारण व भक्कम अर्थकारण या तत्वानुसार सभासदांचे हित जोपासणार व आपली संस्था प्रगती पथावर नेणार हा आमचा सर्वांचा निर्धार व मानस आहे. म्हणून दिनांक १७ एप्रिल २०२२ रविवार रोजी कुऱ्हाड येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत सकाळी ०८ वाजेपासून तर दुपारी ०४ वाजेपर्यंतच्या वेळात वेळेवर येऊन सर्व शेतकरी सहकार विकास पॅनलचे उमेदवारांना आपले अमुल्य असे मत देऊन संस्थेच्या भरभराटीसाठी व आपल्या सेवेची संधी उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती प्रकाशक जगदिश काशीनाथ तेली, सचिन अशोक माळी, रामेश्वर रामदास देशमुख, शांताराम भिका चौधरी, भास्कर नारायण महाजन, रमेश भिका पाटील, देवराव दौलत माळी, दत्तु श्रीपत माळी यांनी केली असुन मतदानास येतांना ओळखपत्र सोबत आणावे असे सुचित केले आहे.