कुऱ्हाड गणातून पंचायत समिती निवडणूकीसाठी, चरणसिंग राठोड इच्छुक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०३/२०२२
नुकताच पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधासभा, लोकसभेच्या निवडणूकींचा बिगुल वाजला या निवडणूका कधी होतील हे आज निश्चित नसले तरी या निवडणुकीत आपल्या हाती सत्ता कशी येईल किंवा कशा पद्धतीने कायम टिकून राहील याकरिता सत्ताधारी, विरोधी प्रयत्नशील असतांनाच अपक्ष व नवनवीन चेहेरे सर्वच कामाला लागले दिसून येत आहेत.
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव तांडा येथील मागील बऱ्याच वर्षापासून शिवसेना पक्षात सक्रीय असलेला असाच एक शिवसैनिक ज्याने स्व.अशोक मिसाळ, स्व.राजेंद्र गरबड वाणी, गणेशजी राणा यांच्यासोबत पाचोरा तालुक्यातील शिवसेनेची पहिली शाखा उघडल्यापासून तर आजपर्यंत न डगमगता शिवसैनिक म्हणून काम करणारा व आजही शिवसैनिक म्हणून गोरगरिबांना शासकीय सवलती मिळवून देणे, रेशनकार्ड मिळवून देणे, वैद्यकीय सेवा मिळवून देत मोफत औषधोपचार मिळवून देणे, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेऊन शक्य होईल तेवढी पदरमोड करुन कार्यक्रम साजरे करणे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सामिल होणे अशी कामे करुन जनतेच्या मनात आदराचे स्थन निर्माण करून लोकप्रिय ठरत असलेला एक शिवसैनिक म्हणजे चरणसिंग महारु राठोड.
अंंबे वडगाव तांडा येथील चरणसिंग राठोड यांचा उद्या एक एप्रिल शुक्रवार रोजी वाढदिवस आहे. उद्या ते ५९ व्या पदार्पण करणार आहेत. म्हणून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी सत्यजित न्यूज कडे संपर्क करून येत्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत मी कुऱ्हाड गणातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे सांगताना त्यांनी सांगितले की मी मागील बऱ्याच वर्षांपासून शिवसेना पक्षात असून एक एकनिष्ठ शिवसैनिक आहे. मी शिवसेनेचे काम करत असतांना स्व. तात्यासाहेब आर.ओ.पाटील. यांनी मला मुलाप्रमाणे प्रेम दिले आहे. स्व.तात्यासाहेब मला खुप काही समजून सांगत त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. त्यांच्यासोबत राहिल्यामुळे मला आमचे पितामह स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेटण्याचा योग आला होता.
तसेच आता पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील. यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा.श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा योग आला एका तांड्यात रहाणारा एक सर्वसाधारण व्यक्ती फक्त आणि फक्त शिवसैनिक असल्यामुळे व मला स्व. तात्यासाहेब आर.ओ.पाटील तसेच आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी भरभरून प्रेम देऊन विश्वास ठेवल्यामुळे मी या दोन महान व्यक्तींना भेटू शकलो हे विसरून चालणार नाही.
तसेच मनुष्य चुकीचा पुतळा आहे असे म्हणतात, आयुष्यात चांगल्या, चांगल्या कडून चुका होत असतात. अशीच एक चुक माझ्या परिस्थीतीमुळे माझ्याकडून झाली होती. मी माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मजबूर होतो व ती चूक मला कबूलही आहे. परंतु मी जेव्हा आमदार आप्पासाहेब मा.श्री. किशोर पाटील यांच्या सहवासात आलो व त्यांनी माझे मन परिवर्तन केले तेव्हापासून मी माझ्या वागण्यात बदल केला थोडक्यात सांगायचे झाल्यास मला आप्पासाहेब किशोर पाटील यांचा सहवास लाभल्याने जसे परीस लागल्यावर लोखंडाचे सोने होते, तसाच बदल माझ्या जीवनात झाला. नंतर पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांनी मला वारंवार संबोधित करत माझे मन परिवर्तीत केल्याने मी ती चुक सुधारुन वागत आहे.
मी शेती व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालवतो माझी दोन मुल कमावती झाली आहेत. म्हणून मी आता समाजाचे काही देणे लागतो म्हणून समाजसेवा करुन समाजाचे ऋण फेडण्याची इच्छा आहे. म्हणून मी आता येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत कुऱ्हाड गणातून शिवसेनेकडून पंचायत समितीच्या निवडणुकीत भाग घेऊन निवडून येत सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी उमेदवारी करणार असल्याची इच्छा बोलून दाखवली तसेच पक्षश्रेष्ठी मला नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.