विरोधकांना कानपिचक्या देत आ. किशोर आप्पा पाटील यांनी दिपावली निमित्त पत्रकारांना दिला मिठाईचा गोडवा व मांडला विकास कामांचा आढावा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२३
पाचोरा भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांनी दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी पाचोरा, भडगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांना आमंत्रित केले होते. यावेळी चर्चासत्र आयोजित करुन पत्रकारांच्या व त्यांच्या परिसरातील समस्या समजून घेतल्या तसेच पत्रकारांनी निर्भिडपणे लिखाण करावे म्हणजे आम्हाला जनतेच्या समस्या व आम्ही काय करत आहोत, काय केले पाहिजे तसेच कळतनकळत आमच्याकडून काही चुका होतात का हे लक्षात आणून देण्यासाठी लिहिले पाहिजे असे सांगून फराळ देऊन सर्व पत्रकारांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या पाचोरा भडगाव तालुक्यातील आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा आढावा समोर ठेवून पुढे जनतेच्या हितासाठी काय करणार आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. ही माहिती देतांना त्यांनी विरोधकांना कानपिचक्या देत खरपूस समाचार घेतला. या प्रसंगी काही पत्रकारांनी आपल्या समस्या मांडल्या असता त्या समजून घेत मी योग असलेल्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले यावेळी पी. बिग. सी. मातृभूमीचे संपादक मा. श्री. प्रविणजी ब्राम्हणे यांनी सुत्रसंचलन तर नांद्रा येथील लोकमतचे प्रतिनिधी मा. श्री. नगराज पाटील यांनी आभार मानले.