आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून ८१ कि.मी. लांबीचे शेत, पाणंद रस्ते मंजूर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२२
शेत शिवारातील रस्त्यांची (पाणंद रस्ते) समस्या ही बऱ्याच वर्षांपासून आहे व होती पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. म्हणून शंभर ते पन्नास एकर जमीनीवर एकहाती मालकी असल्याने रस्त्यांची समस्या नव्हती. परंतु मागील काळात सिलिंगचा कायदा आला यात बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा जमीनी शासनाने ताब्यात घेऊन त्या वाटण्यात आल्या. नंतर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेत शिवारात वाटणी, हिस्से होऊन एकाच गटातून अनेक गट निर्माण झाले.
मात्र या नवीन गटांसाठी वहिवाटी रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत गेली. शेतात जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात शेतात जाणे व शेतीमाल तयार झाल्यावर तो शेतीतून बाहेर काढण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली. यातुनच शेजारी, शेजारी असलेल्या शेतकऱ्यांची भांडणे होणे व इतर समस्या निर्माण झाल्या. हातचे काम सोडून भांडण मिटवण्यासाठी वेळ वाया जात होता. काही भांडणे वर्षांपूर्वीपासून दिवानी, फौजदारी स्वरुपात प्रलंबित आहेत. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आप्पासाहेब किशोर आप्पा पाटील यांनी शासनदरबारी शेतरस्ते (पाणंद रस्ते) बनवण्यासाठी सतत पाठपुरावा करून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत /पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सन २०२२-२३ वर्षाच्या पाचोरा, भडगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी आराखडा तयार करून सततच्या प्रयत्नातून खालील ८१ कि.मी. चे रस्ते मंजूर करुन आणले आहेत.
यात
१) आसनखेडा बु लासगाव ता. पाचोरा रस्ता विजय आधार पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी. रस्ता
२) अंतुर्ली बु प्र. पा ता. पाचोरा अंतुर्ली पासून ते तलावाकडे जाणारा खोल रस्ता २ कि.मी.
३) लासूरे ते वानेगाव ता. पाचोरा राजुरी धरण जि प शाळा ते वानेगाव रस्त्यापर्यंत २ कि.मी.
४) वडगाव खु ता. पाचोरा प्र. भ स्मशानभूमी पासून ते विठ्ठल बीजेसिंग पाटील यांच्या शेतापर्यंत २ कि.मी.
५) पिंपळगाव बु हरे ता. पाचोरा कल्पना दिलीप बडगुजर ते मनीषा राजेंद्र बडगुजर यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
६) वरसाडे ता. पाचोरा शिव लखीचंद सीताराम पवार ते अर्जुन बधू नाईक यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
७) मोहाडी ता. पाचोरा मांगो पांडुरंग पाटील यांच्या शेतापासून ते गोपीचंद खंडू पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
८) नाचणखेडा ता. पाचोरा ते लुभान नरसिंग पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
९) लोहटार ता. पाचोरा डॉ जगदीश शंकर महाजन ते महेंद्र राजाराम पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
१०) डोकलखेडा ता. पाचोरा भारत भीमसिंग पाटील ते चिंतामण आनंदा पाटील यांच्या शेतापर्यंत शिवरस्ता १ कि.मी.
११) वडगावडे ता. पाचोरा शरद इंगळे यांच्या शेतपासून ते देवचंद पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
१२) पुनगाव ता. पाचोरा उल्हास मराठे यांचे शेतपासून ते योगेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतापर्यंत २ कि.मी.
१३) माहिजी ता. पाचोरा पंढरीनाथ बळीराम पाटील यांच्या शेतपासून ते पितांबर धनाजी बाविस्कर यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
१४) जारगाव ता. पाचोरा भावराव वेडू पाटील यांच्या शेतपासून ते प्रकाश रामा पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
१५) खडकदेवळा खु ता. पाचोरा मराठी शाळेपासून ते गायरान आळीवाट पर्यंत २ कि.मी.
१६) होळ /सांगवी ता. पाचोरा संजय रामदास पाटील यांच्या शेतपासून ते गंगाराम किसन पा. १ कि.मी.
१७) सावखेडा बु ता. पाचोरा रमेश परदेशीं गट नं.४३ ते सरदार परदेशीं गट नंबर १७, २ कि.मी.
१८) नगरदेवळा ता. पाचोरा ठाकरे रस्त्यावरील गट नंबर १४८ते गट नंबर १६८, १ कि.मी.
१९) टाकळी बु ता. पाचोरा गावापासून भानुदास किसन शेळके १ कि.मी.
२०) आखतवाडे ता. पाचोरा ते खाजोळा पाणंद रस्ता १ कि.मी.
२१) सार्वे ता. पाचोरा शांताराम खुशाल यांच्या शेतापासून भागवत पा. यांच्या शेतापासून १ कि.मी.
२२) अटलगव्हाण ता. पाचोरा गावासून ते प्रदीप दत्तात्रय पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
२३) घुसर्डी ता. पाचोरा भास्कर विश्राम पाटील अनिकेत निकुंभ यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
२४) खाजोळा ता. पाचोरा गोरख भगवान पाटिल यांच्या शेतपासून दीपक काशिनाथ पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
२५) निपाणे ता. पाचोरा नामदेव जोहारमल पाटील यांच्या शेतापासून ते देविदास फकिरा पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
२६) राजुरी ता. पाचोरा ते पा. पु. विहिरी पर्यंत १.५० कि.मी.
२७) राजुरी खु ता पाचोरा शेखलाल तडवी ते किशोर युवराज उभाळे यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
२८) सातगाव डो. ता. पाचोरा चंद्रकला लांढे गट नं.२९ ते दीपक जमधाडे यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
२९) सावखेडा खु पाचोरा प्रेमचंद बालचंद परदेशीं यांच्या शेतापासून ते पितांबर देवचंद यांच्या शेतापर्यंत २ कि.मी.
३०) वडगाव अंबे ता. पाचोरा सचिन राठोड गट नं ८३ पासून गणपती मंदिर विजय रणजित राठोड यांच्या शेतापर्यत १ कि.मी.
३१) वाडी ता. पाचोरा ते राजुरी शिव १.५० कि.मी.
३२) निंभोरा ता पाचोरा राजाराम गणपत ते शुकळे मारोती मंदिर २ कि.मी.
३३) मोंडाळे ता. पाचोरा जगदेव आनंदा पुंड ते भिकन महादू गायकवाड २ कि.मी.
३४) बांबूरुड प्र बो बहुद्देशीय हॉल ते भूषण सांगळे यांच्या शेतापर्यंत २ कि.मी.
३५) गाळण बु ता पाचोरा शिवाजी हसरत पाटील यांच्या घरापासून ते पंडित बंडू सोनवणे यांचा शेतार्यन्त हनुमानवाडी ते गारखेडा शिवार रस्ता नंबर १, २ कि.मी.
३६) वडगाव मुलाने ता पाचोरा गोरख भीमसिंग पाटील यांच्या शेतापासून ते निंबा महाराज दिघी बदरखे शिव पर्यंताचा रस्ता २ कि.मी.
३७) कुरगी ता. पाचोरा बाबुलाल श्रावण चौधरी यांच्या शेतापासून ते नवीन हायस्कुल पर्यंत कुंभार गल्लीमागील बाजूला १ कि.मी.
३८) तारखेडा ता. पाचोरा युवराज दोधू बडगुजर ग्रा प पा पु विहीर पर्यंत १ कि.मी.
३९) वरसाडे प्र. बो ता पाचोरा स्मशानभूमी ते विठ्ठल मंदिर संस्था १ कि.मी.
४०) डांभुर्णी ता. पाचोरा गोविंद लालचंद परदेशीं यांच्या शेतापासून ते पवन गणेश परदेशीं यांच्या शेतापर्यत १ कि.मी.
४१) वरखेडी ता.पाचोरा बहुळा नदीवरच्या बाजूचा जुना लासुरे रस्ता ते लोहारी शिव पासून वरखेडी मुख्य रस्ता १ कि.मी.
४२) शेवाळे ता पाचोरा धनराज सुकदेव शिंदे यांच्या शेतापासून ते संजय लक्ष्मण भुगरे यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
४३) बाम्बरूड खु प्र पा साहेबराव युवराज पाटील यांच्या शेतापासून ते गिरणा नदी पर्यंत १ कि.मी.
४४) लासगाव ता. पाचोरा महादू खंडू बडगुजर ते नारायण महादू पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
४५) सारोळा खु ता पाचोरा विकास संतोष पाटील यांच्या शेतापासून सतीश नथू पाटील यांचे शेतापर्यंत १ कि.मी.
४६) दिघी कैलास हेमराज ठाकूर ते विलास प्रतापसिंग यांचे शेतापर्यंत १ कि.मी.
४७) परधाडे ता पाचोरा विकास विठ्ठल पाटील यांच्या शेतापासून ते रवींद्र उत्तमराव पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
४८) बाळद बु ता भडगाव उप्पलखेडा वडगाव बु प्र पा सुभाष काशिनाथ पाटील ते बाळू बळीराम पाटील यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
४९) चिंचपुरे संजय संजय दयाराम पवार ते आबा नामदेव पाटील यांच्या शेतापर्यंत सारोळा बु जगन सुकदेव गायकवाड ते मोंढाळा शिवरस्ता १ कि.मी.
५०) बदरखे ता पाचोरा बापू नारायण गढरी ते गणपत गढरी यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
५१) खडकदेवळा बु ता पाचोरा भाऊसाहेब लोटन पाटील यांच्या शेतापासून ते संभाजी शिवाजी पाटील यांच्या शेतापर्यंत १किमी
५२) सार्वे बु ता पाचोरा भरत पतंगराव पाटील यांच्या शेतापासून ते साहेबराव वासुदेव कपाटे यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
५३) साजगाव ता पाचोरा ते खेडगाव रस्ता १ कि.मी.
५४) सारोळा खु ता. पाचोरा उमदे धरण १ कि.मी.
५५) बांबूरुड प्र भ ता भडगाव दौलत हरचंद पाटील यांच्या शेतापासून ते राजू लालचंद परदेशीं यांच्या शेतापर्यत १ कि.मी.
५६) नावरे ता. भडगाव दलचंद परदेशीं यांच्या शेतापासून ते श्रावण आधार यांच्या शेतापर्यंत १ कि.मी.
५७) पाथराड ता भडगाव तांडा ते पिरबाबा पर्यंत १ कि.मी.
५८) कोठली ता भडगाव दामू नाना पाटील यांच्या शेतापासून प्रवीण महादेवराव पाटील यांच्या शेतापर्यन्य १ कि.मी.
५९) घुसर्डी ता भडगाव रायचंद परदेशीं ते आत्माराम भीमा यांचे शेतापर्यंत १ कि.मी.
६०) मळगाव ता भडगाव साहेबराव मोरे यांचे शेतापासून अशोक मोरे यांच्या शेतापर्यंत १किमी
६१) वडजी ता भडगाव रोकडा फार्म मथुराबाई परदेशी शेतापर्यंत १ कि.मी.
६२) भोरटेक ता भडगाव एकनाथ महाजन ते पाझर तलावापर्यंत १ कि.मी.
६३) वडली ता भडगाव कैलास पाटील ते रामकुवरबाई परदेशीं शेतापर्यंत १ कि.मी.
६४) वाडे ता भडगाव स्वप्नील परदेशीं भीमराव माळी यांचे शेतापर्यंत १ कि.मी.
६५) जुवार्डी ता भडगाव सुरेश पाटील प्रकाश पाटील यांच्या शेतापर्यत १ कि.मी
६६) खेडगाव ता भडगाव श्रीकांत पाटील ते मालूबाई पाटील शेतापर्यंत १ कि.मी.
६७) तांदूळवाडी ता भडगाव उमरखेड शिवार विलास युवराज यांच्या शेतापासून निर्मलाबाई नारायण पाटील यांचे शेतापर्यंत १ कि.मी.
६८)बोदर्डे ता भडगाव लोणपिराचे पर्यंत १ कि.मी.
असे रस्ते मंजूर झाल्यामुळे या शिवारात शेतकरी आनंद व्यक्त करत असून त्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले आहेत.