टोणगाव येथील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०७/२०२१
भडगाव तालुक्यातील टोणगाव येथील महार बटालियन रेजिमेंट मध्ये भरती झालेले शहीद जवान निलेश सोनवणे हे आपले कर्तव्य बजावत त्यांना १० तारखेला लेह लडाख येथे वीरमरण आले होते. आज त्यांचा पार्थिव औरंगाबाद हून सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरी आल्यावर परिवाराने मोठा हंबरडा फोडला या वेळी “जय जवान जय किसान”, “वंदे मातरम्”,”भारत माता की जय” अश्या घोषणा दिल्या जात होत्या.
निलेश सोनवणे यांची शोकमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात देश सेवक,युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या दरम्यान रस्त्याने जातांना गावकऱ्यांनी अखेरचा निरोप देण्यासाठी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून रांगोळीच्या माध्यमातून शहिद निलेश सोनवणे यास भावपूर्ण श्रध्दांजली दिली होती. फुलांचा वर्षाव करीत अखेरचा निरोप देत होते.
गिरणा नदिच्या काठावर त्यांच्या अंत्यसंस्कार समई मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती.त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती.त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग देऊन ग्रिनिडियाल टी. ए.११८ बटालियन भुसावळ युनिटच्या १२ जवानांनी व जळगाव पोलीस मुख्यालयातील १५ पोलीस जवानांची तुकडीने आकाशात बंदुकीच्या ३ फैरी झाडल्या व अखेरची मानवंदना दिली.
या प्रसंगी.आमदार किशोर आप्पा पाटील तहसीलदार सागर ढवळे,गटविकास अधिकारी वाघ साहेब, विस्तार अधिकारी टी.पी.मोरे, ,पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, नपा.मुख्याधिकारी विकास नवाले,सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, वैद्यकीयअधिकारी पंकज जाधव , पोलीस निरीक्षक अशोकराव उतेकर पोलीस उपनिरीक्षक पठारे साहेब, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे.पो.स्कॉ.लक्ष्मण पाटील,ईश्वर पाटील,भगवान चौधरी,रावते दादा, यांच्यासह तालुक्यांतील व परिसरातील विविध प्रकारचे संघटनांचे व विविध प्रकारचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी व विविध माध्यमांचे प्रतिनिधी,युवा वर्ग ,महिला वर्ग , मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.