पाचोरा येथे पी.जे.रेल्वे गाडी बचाव कृती समिती तर्फे धरणे आंदोलनात, आजी, माजी आमदारांचा सहभाग.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०१/२०२२
आज पाचोरा येथे पाचोरा, जामनेर पी.जे. रेल्वे पुर्ववत सुरु करण्यात यावी याकरिता पाचोरा,जामनेर पी.जे. रेल्वे बचाव कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलन स्थळी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी भेट देऊन पी.जे. गाडीच्या पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या मालमत्तेपैकी संबंधितांपैकी कुणीही एक नट, बोल्ट जरी हलवला किंवा काढला तर होणाऱ्या परिणामास रेल्वे प्रशासन संबंधित ठेकेदार हे जबाबदार राहतील अशा पद्धतीचे आवाहनपर समर्थन पी.जे. बचाव कृती समितीला दिले आहे.
तसेच माजी आमदार मा.श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी पी.जे. रेल्वे ही पाचोरा जामनेरचा ऐतिहासिक वारसा आहे. तो बंद होऊ देणार नाही असे आश्वासन देत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवेला. तसेच पि.टी.सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री. संजय वाघ, विध्नहर्ता मल्टी स्पेशलिस्टी दवाखान्याचे संचालक मा.श्री. भूषण मगर, मा. श्री. दत्ता आबा पाटील, मा.श्री. सचिन सोमवंशी, प्राचार्य मा.श्री. वासुदेव वले, एकता ऑटो रिक्षा असोसिएशन अध्यक्ष मा.श्री. एकनाथ सदांशिव, मा.श्री. अनिल लोंढे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री. नाना देवरे, मा.श्री।. संजय जडे, मराठा सेवा संघाचे मा.श्री. प्रवीण पाटील, डॉक्टर असोशियन संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मा.श्री. नरेश गवांदे डॉ.मा.श्री. अतुल पाटील, वकील बार असोसिएशनचे ऍड मा.श्री. प्रवीण पाटील,मा.श्री. सुनील पाटील, भारतीय मजदूर संघाचे डी एन पाटील आकाश पथरोड व्यापारी असोसिएशनचे मा.श्री. जगदीश पटवारी पत्रकार संघटना यांनी लेखी स्वरूपात घटनास्थळी येऊन पाठिंबा दिला.
धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष खलीलदादा देशमुख, व्ही.टी.जोशी, कायदेतज्ञ मा.श्री. अविनाश भालेराव,मा.श्री. पप्पू राजपूत,मा.श्री. भरतखंडेलवाल,मा.श्री. सुनील शिंदे सर, मा.श्री. नंदकुमार सोनार,मा.श्री. मनिष बाविस्कर कायदेतज्ञ मा.श्री. अण्णासाहेब भोईटे,मा.श्री. गणेश पाटील रंजीत पाटील,मा.श्री. दत्ता पाटील,मा.श्री. मंगेश पाटील,मा.श्री. भालचंद्र ब्राह्मणे,मा.श्री. अविनाश पवार,मा.श्री. दीपक आदिवाल मा.श्री. वाल्मीक पाटील,मा.श्री. अनिल आबा येवले,मा.श्री. निलेश कोटेचा,मा.श्री. राजू पाटील मा.श्री. संतोष पाटील तसेच पाचोरा शहरातील नागरिक यांनी सहभाग नोंदवला.