पिंपळगाव हरेश्वर पोलिसांतर्फे बिना नंबरप्लेट दुचाकींना, नंबरप्लेट बनवून देण्याच्या उपक्रमास सुरवात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२२
जळगाव जिल्ह्यातील रहदारीला शिस्त लावण्यासाठी तसेच वाहन चोरी गेल्यावर तपासकामी तसेच एखादा अपघात घडल्यानंतर अपघाताच्या ठिकाणाहून वाहनधारक पळुन जातांना किंवा अपघात झाल्यानंतर वाहनांची व वाहनधारकांची ओळख पटवण्यासाठी पटवण्यासाठी नंबरप्लेट हा एकमेव उपाय आहे.
परंतु जळगाव जिल्ह्यातील रस्त्यावर बरीचशी स्वयंचलित वाहने आर.टी.ओ.कडुन वाहन प्रमाणीत करुन घेतल्यानंतर वाहनाला नंबरप्लेट न लावताच वापरतांना दिसून येतात तर काही वाहनचालक वेगवेगळ्या डिझाईन व चित्र, विचीत्र नंबरप्लेट आपल्या वाहनांवर लावून फिरतांंना दिसून येत आहेत. या गैरप्रकारांमुळे वाहन चोरी गेल्यावर तपासकामी तसेच एखादा अपघात घडल्यानंतर अपघाताच्या ठिकाणाहून वाहनधारक पळुन जातांना किंवा अपघात झाल्यानंतर वाहनांची व वाहनधारकांची ओळख पटवण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याची बाब जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री.प्रविणजी मुंडे साहेब यांच्या लक्षात आल्यावर तसेच शिस्त लावण्यासाठी वाहनधारकांना वारंवार दंड आकारुनही कोणताही बदल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता नंबरप्लेट नसलेल्या वाहनधारकांना पकडून दंड न आकारता किंवा कोणतीही कारवाई न करता थेट नंबरप्लेट बनवून वाहनास बसवून देण्यासाठीचा हाच एकमेव उपाय आहे व तो अमलात आणण्यासाठी तसे आदेश काढून जिल्हाभरातील पोलिस स्टेशनला तश्या सुचना केल्या आहेत.
या सुचनेनुसार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री. महेंद्र वाघमारे साहेब यांनी जमादार उदय कुलकर्णी, पोलिस नायक दिपक अहिरे, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बोडके, पोलिस कॉन्स्टेबल मुकेश लोकरे, होमगार्ड राजु पवार, संजय पाटील, संजय वाघ, दिलीप वानखेडे यांचे पथक तयार करुन पिंपळगाव हरेश्र्वर तसेच पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीत रस्त्यावर अशी वाहने आढळून आल्यावर त्यांना पकडून थेट पोलिस स्टेशनला आणून त्यांचेवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याच्या जवळ असलेल्या वाहनाला नंबरप्लेट बनवून बसवून देण्यासाठी मोहीम सुरू केली असून आहे. आज रोजी बातमी लिहून होईपर्यंत पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी ३८ वाहनधारकांना पकडून त्यांच्या वाहनाला नंबरप्लेट बसवून दिल्या आहेत.
ही मोहीम राबवण्यात येत असल्याने वाहनधारकांना शिस्त लागणार असून संभाव्य अडीअडचणीचा तिढा सुटणार आहे. या राबविण्यात येणाऱ्या मोहिमेबाबत सुज्ञ नागरिक व वाहनधारकांकडून पोलिस अधीक्षक साहेब व पिंपळगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.