शेतकऱ्यांना कृषी विम्याचा लाभ न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पाटील यांचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२३
पाचोरा तालुक्यात गेल्या खरीप हंगामात तालुक्यातील १४ हजार १८ शेतकऱ्यांनी ॲग्रिकल इन्सुरंन्स कंपनीकडून ५ कोटी २१ लाख रुपये भरून पाचोरा तालुक्यात कापूस पीक हे मुख्य पीक असल्याने पीक विमा उतरवला होता. याची सुरक्षित काॅस्ट ५२ कोटी २९ हजार २९४ इतकी होती. दिनांक १८ ते २० ऑक्टोंबर दरम्यान तालुक्यात तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने कापसाचे पीक जोमात असतांनाच झाडावरील फुले, पात्या, कैऱ्या पडल्याने “होत्याचे नव्हते” झाले आणि उत्पादनात मोठी घट झाली. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७२ तासात कंपनीकडे ऑनलाईन अर्ज दाखल करावयाची मुदत होती. मात्र दरम्यानच्या काळात कंपनीचे सर्वर डाऊन असल्याने तांत्रिक अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. यामुळे फक्त १४ हजार १८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करु शकले परंतु त्यातही कंपनीने केवळ ६ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिल्याने शेतकऱ्यांनी ५ कोटी २१ लाख ९१ हजार ४० रुपयाचा लाभ देवून १ कोटी ८४ लाख ९४ हजार ७७३ रुपयांचा केवळ तीन महिन्यात मलीदा खाल्ला आहे.
यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक विवंचना पाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पाटील, तालुकाप्रमुख रमेशचंद्रजी बाफना यांनी ॲग्रिकल इन्सुरंन्स कंपनीचे समन्वयक मिलींद अहिरे व समाधान मोरे यांची तहसिलदार यांच्या दालनात निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, मंडळ अधिकारी संजय मोहिते, विजय पाटील यांची संयुक्त बैठक घेऊन विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले.
यावेळी एस. टी. कामगार सेनेचे तालुका प्रमुख अजय पाटील, प्रगतशील शेतकरी ईश्वर पाटील उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी बैठकीत झालेल्या विषयाचे प्रोसीडींग तयार करून ते कंपनिच्या वरीष्ठ अधिकारी व कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील व रमेश बाफना यांनी कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी १२ तारखेपर्यंत अल्टीमेट दिले असून दरम्यान पैसे न भेटल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १३ तारखेपर्यंत जळगाव जिल्ह्यात येणार असल्याने त्यांना घेरणार असल्याचे सांगितले.
पाचोरा तालुक्यात केवळ सात ते आठ ठिकाणी पर्जन्यमान मापक असून अनेकदा पाऊस एका शेतात पडतो तर त्याच गटांतील दुसऱ्या शेतात पडत नाही का ? कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतावर न जाता एकाच ठिकाणी बसून पंचनामे केले यातील शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेशचंद्रजी बाफना यांचे उदाहरण देतांना त्यांनी सांगीतले की माझे एकाच शिवारात एकाच गटात तीन ठिकाणी शेती असून मी तीघ शेतांचा सारखाच विमा उतरवला आहे मात्र मला एका शेताचे ४२ हजार रुपये, दुसऱ्या शेताचे २ हजार ७०० रुपये तर तिसऱ्या शेताचे १ हजार ३०० रुपये नुकसान भरपाई मिळाली. मग कंपनीच्या लोकांनी ही रक्कम देतांना कशाचा आधार घेतला ? या विषयावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.
“शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय जोडे बाजूला करून एकत्र लढा” अरुण भाऊ पाटील.
पाचोरा तालुक्यात गेल्या तीन चार वर्षांपासून कमी अधिक पाऊस, गारपीट, कोरडा दुष्काळ यामुळे सतत शेतकऱ्यांवर आस्मानी संकटं येत आहे. याशिवाय कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती येते व त्यामुळे पीकांचे मोठे नुकसान होते ही नुकानीची भरपाई मिळेल या अपेक्षेने शेतकरी पीकाचा विमा उतवितात मात्र त्यांची फसवणूक होते. शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्र येऊन लढावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांनी केले आहे.